कोरोना पॉजिटीव्ह पोलीसाने केले सिमा बंदीचे उल्लंघन:जिल्हयात खळबळरिपोर्टर:पोलीसांच्या आणि प्रशासनाच्या आथक प्रयत्नाने उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन मध्ये आल्याचे दोन ते तिन दिवसाखालीच प्रशासनाकडुन सांगण्यात आले होते.परंतु एका पोलीस कर्मचा—याच्या चुकीमुळे पुन्हा जिल्हयावर कारोनाचे संकट येते की काय?आशी परिस्थिती निर्माण झाली आहे.सोलापूर येथे दिवटी ला असलेला आणि उस्मानाबाद तालुक्यातील चिखली गावचा रहिवाशी असलेला पोलीस कर्मचारी कोरोना पॉजिटीव्ह निघाला असुन त्यानी सिमा बंदीचे उल्लंघन करून उस्मानाबाद जिल्हयामध्ये प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली आहे. 
उस्मानाबाद जिल्ह्यात अनधिकृत आलेला हा पोलीस कॉन्स्टेबल कोरोना पॉजिटीव्ह निघाल्यामुळे चिखली गावात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर कोरोना बाधित पोलीस कॉन्स्टेबलचे आई- वडील, भाऊ, भावाची पत्नी  आदीना उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना वार्डात  भरती करून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजाभउ गलांडे यांनी सांगितले.उस्मानाबाद तालुक्यातील चिखली गावातील हा पोलीस कर्मचारी सध्या सोलापूर पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे. तो दि.२४ एप्रिल रोजी गावाकडे आला होता.सोलापुरात त्याची कोरोना टेस्ट   झाल्यानंतर तो पॉजिटीव्ह निघाला आहे.
रेड झोन मध्ये असलेला सोलापूर जिल्हा हा कोरोनाचा हॉटस्पॉट आहे तर उस्मानाबाद जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नाही.या पोलीस कॉन्स्टेबलमुळे उस्मानाबाद जिल्हा अडचणीत आला आहे.कायदयाचे उल्लंघन करूण उस्मानाबाद जिल्हयाला कोरोनाच्या संकटामध्ये टाकणा—या या पोलिसावर काय कार्यवाही होणार हा मोठा प्रश्न असुन ठिकठिकानी चेक पोस्टवर उभे राहुन दुस—याला शाहनपण शिकवणा—या पोलीसांनी सोलापुर जिल्हयाच्या शि्मेवरूण या पोलिसाला कशासाठी सोडले हा मोठा प्रश्न आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या