ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित करण्यास आयनॉक्सचा विरोध

रिपोर्टर: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टी, विशेषत: सिनेमा मालकांवर वाईट परिणाम झाला आहे. थिएटर अखेर कधी उघडतील याचे उत्तर कोणाकडेही नाही. दरम्यान, निर्मात्यांनी त्यांचे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयानंतर डिस्ट्रीब्युटर्स आणि एक्झिबिटर्स यांच्यात खळबळ उडाली आहे. मात्र, प्रोड्यूसर गिल्ड इंडियाने एक निवेदन जारी करत ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.

आयनॉक्सने विरोध केल्यानंतर पीजीआयने शुक्रवारी एक निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये लिहिले आहे - मल्टीप्लेक्समध्येच चित्रपट प्रदर्शित करण्याला आमचे प्राधान्य आहे आणि ते नेहमीच राहील. परंतु सद्य परिस्थितीत हा निर्णय घ्यावा लागला आहे. चित्रपट पुढेही प्रदर्शित होण्यासाठी, आपण शोबिजमध्ये राहणे आवश्यक आहे. प्रॉडक्शन क्षेत्राला दररोज 100 कोटींपेक्षा जास्त नुकसान होत आहे.
चित्रपटाच्या शूटिंगसाठी तयार करण्यात आलेले सेट काढले गेले आहेत कारण शूटिंग पुन्हा कधी सुरू होईल याबद्दल काहीच शाश्वती नाहीये. सेट आणि स्टुडिओ भाड्याने देणे, शूट शेड्यूल रद्द झाल्यानंतरचा चार्ज निर्मात्यांना द्यावा लागतोय. विमा कंपन्यांकडूनही कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही.
आपल्या निवेदनाच्या शेवटी, पीजीआयने म्हटले आहे की, जेव्हा देशभरातील चित्रपटगृहे पुन्हा उघडली जातील तेव्हा प्रोड्युसर्सना पुन्हा एकदा एग्झिबिशन सेक्टरमध्ये काम करायला आवडेल. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांना मोठ्या संख्येने परत आणण्यासाठी जे काही करावे लागेल, ते सर्व आम्ही करु.
ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित करण्यास आयनॉक्सचा विरोध
निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपले चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णयामुळे सिनेमागृहांचे मालक संतापले आहेत. आयनॉक्सने आपला संताप व्यक्त करण्यासाठी पत्रक जारी केले आहे. या आघाडीच्या सिनेमागृह कंपनीने चित्रपट निर्मात्यांसाठी एक पत्र लिहिले आहे. “कुठलाही चित्रपट हा सर्वात प्रथम सिनेमागृहांमध्येच प्रदर्शित केला जावा. त्यानंतर तो इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आल्यास आम्हाला हरकत नाही. निर्माते आणि सिनेमागृह यांच्यात चांगले संबंध आहेत. मात्र निर्मात्यांच्या या नव्या निर्णयामुळे हे संबंध ताणले जात आहेत. लॉकडाउनमुळे तुमच्याप्रमाणे आम्हाला देखील मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत आहे. चित्रपट आणि थिएटर हे वर्षानुवर्षांचे अतुट नाते आहे. प्रतिकूल परिस्थितीत आपण एकमेकांची मदत करायला हवी. कृपया निर्मात्यांनी ओटीटीचा चा मार्ग स्विकारु नये.” अशा आशयाचा मजकुर या पत्रकामध्ये लिहिला आहे.

हे चित्रपट ओटीटीवर रिलीज होत आहेत

29 मे पोनमाल वंदल (तामिळ)

12 जून गुलाबो सीताबो (हिंदी)

19 जून पेंग्विन (तमिळ आणि तेलगू)

26 जून कायदा (कन्नड)

24 जुलै फ्रेंच बिर्याणी (कन्नड)

याशिवाय विद्या बालनच्या शकुंतला देवी (हिंदी) आणि

 सुफीयम सुजातयम (मल्याळम)
या चित्रपटाचा प्रीमियरदेखील होणार आहे. सुफीयम सुजातयम या चित्रपटात जयसूर्या आणि आदिती राव हैदरी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या