१०६ हुतात्म्यांच्या पविञ स्मृतीस विनम्र अभिवादन आठवावा शहीदांचा प्रताप .आज १ मे अर्थातच महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन म्हणून सर्व भारतीय मराठी भाषिक साजरा करतात .आपणास माहीत आहे १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.भारत देशातील तमाम मराठी भाषकासाठी मुंबई सह महाराष्ट्र हे एक स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले.स्वातंत्र्यपूर्व काळात तसेच  देश स्वातंत्र्यानंतर सुध्दा मराठी भाषिक,मराठी साहीत्यिक ,मराठी पञकार ,लेखक,शाहीर ,विधीज्ञ व पञपंडीतांना ,सामान्यासह कामगारांना मराठी च्या लढ्यासाठी खूप झुंजावे लागले.
जेव्हा तत्कालीन पंतप्रधान  पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी १९५६ साली मुंबई हे स्वतंत्र केंद्र शासीत प्रदेश असेल असे जाहीर केले तेव्हा मुंबई सह महाराष्ट्रातील तमाम मराठी माणूस पुरताच खवळून निघाला तर दुसरीकडे देशातील राज्य पुर्नररचना आयोगाने भाषावार प्रांतरचनेला सहमती दर्शवताना महाराष्ट्र ला मुंबई मिळणार नसल्याचे संकेत दिले .दरम्यान च्या काळात सेनापती बापट,काॕम्रेड आण्णा डांगे ,प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अञे ,एस .एम.जोशी ,शाहीर आण्णाभाऊ साठे,शाहीर अमर शेख, यांनी मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र हे घोषवाक्य निर्माण करत आपल्या साहीत्याच्या शाहीरीच्या कलेवर मराठी अस्मीतेची ज्योत तोवत ठेवली .अशातच देशभरातील तमाम मराठी भाषिक पुरताच पेटून उठला व मुंबईत सभा,संमेलनाच्या ,साहीत्याच्या मराठी च्या नावाखाली एक वटला.आपल्या ला मुंबई पासून तोडण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आले कारण मुंबई ही खरी मराठी भाषकांची असल्याचे महाराष्ट्र राज्य एकीकरण परिषदेने त्यांच्या संमेलनात वारंवार बोलून दाखविले होते.मुंबई हे व्यापारासाठी महत्त्वाचे बंदर तसेच देशाचे प्रवेशद्वार आर्थिक केंद्र असल्यामुळे पूर्ण देशाच्या नजरा मुंबई कडे होत्या मुंबई तील काही गुजराथी व्यापार्यांनी मुंबई मिळविण्यासाठी अटोकाठ प्रयत्न केले होते.
 .सरकारकडे सर्व मराठी भाषिकांनी  एकच मागणी लावून धरली आम्हाला मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र असेच राज्य पाहीजे .मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र हे घोषवाक्य निर्माण करत संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबईत खूप मोठे आंदोलन छेडले गेले .देशातील तमाम मराठी भाषिक मुंबईत एकञ आल्याने आंदोलनाला आभूतपूर्व  गर्दी उसळली मुंबई सह महाराष्ट्र या गगणभेदी घोषणा देत असताना परिस्थिती हाताबाहेर गेली सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याने तब्बल १०६ मराठी भाषिकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. आपण एकच बोध घ्यावा हा संयुक्त महाराष्ट्र आपल्या सहज मिळाला नाही त्यासाठी आपल्या बांधवांचे रक्ताचे पाट वाहीलेत त्या चळवळीत अनेक हुतात्मे शहीद झाले.महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांनी १ मे महाराष्ट्र दिन साजरा करताना  संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना शहीदांना त्यांच्या पवित्र स्मृतीस ञिवार अभिवादन कराव
जय हिंद जय महाराष्ट्र !!

 लेखक  नितीन जाधव
 मंञालय मुख्य संपर्क प्रमुख
 महाराष्ट्र राज्य मराठी पञकार * संघ,मुंबई*
 मो *. ९३२६३९८००१* 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या