भुम,परंडा,वाशी मित्र मंडळाचा उस्मानाबाद तालुक्यातील बालगृहांना मदतीचा हात:

रिपोर्टर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजूवंताना मदत करण्याचे काम आवघ्या महाराष्ट्राने हाती घेतले आहे.त्याच धरतीवर उस्मानाबाद येथे कार्यरत असलेल्या भुम,परंडा,वाशी मित्रमंडळाने महाराष्ट्र दिनाच्या दिवशी उस्मानबाद तालुक्यातील बालगृहांना मदतिचा हात दिला.तालुक्यातील तिन बालगृहांना दिड महिना पुरेल एवढया जिवनावश्यक सहित्याचे वाटप उस्मानाबादचे तहसिलदार गणेश माळी आणि नायब तहसिलदार मुस्ताफा खोंदे, यांच्या हास्ते करण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश बप्पा कवडे, तसेच मंडळाचे सदस्य मधुकर अनभुले, कैलास मोटे, विलास मोटे, संतोष चौधरी, दिलीप चौधरी,पत्रकार चेद्रशन देशमुख,पत्रकार श्रीराम क्षिरसागर,बाळासाहेब डोके, विवेक कापसे, सुर्यकांत कापसे, डॉ.तांबे, वकील प्रदिप हुंबे, सेवानिवृत्त अधिव्याख्याते धुमाळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

सध्या कोरोना महामारीच्या संकटामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे, अनेक शहरात मजूर-कामगार,विदयार्थी अडकून पडलेले आहेत.. त्यांना खाण्यापिण्याच्या आडचनी येत आहेत.ही परिस्थिती लक्षात घेवून  भुम,परंडा,वाशी मित्र मंडळाकडुन काही बालगृहांना जिवनावश्यक सहित्यांची मदत करण्यात आली.यामध्ये जिवन विकास बालगृह कसबे-तडवळे ,कै.दादाराव मोरे बालगृह सिद्धेश्वर वडगाव आणि धर्मवीर संभाजीराजे सामाजीक संस्था संचलीत निरीक्षण गृह,बालगृह उस्मानाबाद या ठिकाणी राहत असलेल्या निवासी अनाथ- निराधार विद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या वतीने मदत करण्यात आली.मंडळाच्या सर्व सदस्यांनी आप-आपल्या स्वईच्छेने किमान 500 ते 1 हजार, 2 हजार अशा पध्दतीने ज्यांना जास्तीत जास्त मदत करणे शक्य आहे त्यांनी पैसे जमा करुन जीवनोपयोगी किराणा वस्तुंची खरेदी केली. यामध्ये गव्हू, तांदुळ,तुरडाळ,शेंगदाणे, खाद्य तेल, तिखट-मीठ पुडे,कपडा-अंघोळीसाठीचे साबण) या वस्तुंची साधारणत:एक ते दिड महिना पुरेल एवढे साहित्य सदर बालगृह चालक कर्मचाऱ्यांकडे आज उ'बादचे तहसिलदार गणेश माळी ,नायब तहसिलदार मुस्ताफा खोंदे,यांच्या हास्ते देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या