रिपोर्टर
जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे 8 नवीन रुग्ण पाॅझिटिव्ह सापडले असुन त्यामध्ये कळंब तालुक्यात 2 परांडा तालुक्यात 3 उस्मानाबाद तालुक्यात 2 तर उमरगा तालुक्यात 1 आसे मिळुन 8 रुग्ण एकाच दिवशी आढळुन आल्याने जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह चा आकडा 43 वर पोहचला आहे.
दि. 26/5 रोजी जिल्ह्यातील 77 जणांचे स्वाॅब तपासणीसाठी पाठवले होते त्या पैकी 66 रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्या पैकी परांडा कुकडगाव येथील तीन रुग्ण मुंबई रिटर्न, पॉसिटीव्ह आहेत. तसेंच कळंब येथील भातशिरपूरा येथील एक मुंबई रिटर्न आहे, तसेच उमरगा तालुक्यातील बेडगा येथील एक रुग्ण पॉसिटीव्ह असून मुंबई रिटर्न आहे.तर उस्मानाबाद शहरातील सापडलेला रुग्ण हा साठे चौकातील असल्याचे समजते.तर मंगळवारी दुपारी पॉझिटिव्ह आलेल्या तीन व्यक्ती पैकी एक उस्मानाबाद शहरातील पापनाश नगर चा रुग्ण असून तो मुंबई येथून प्रवास करून आलेला आहे. दुसरा तेर येथील रुग्ण असून तो पुणे येथून प्रवास करून आलेला आहे. तर तिसरा पॉझिटिव्ह रुग्ण हा कळंब तालुक्यातील शिराढोण येथील यापूर्वीच्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेला आहे, आशा प्रकारे जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा 43 वर पोहचल्याची माहीती जिल्ह्रा आरोग्य यंञने कडून समजली आहे
0 टिप्पण्या