महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला पोलीस महासंचालक पदकांची घोषणा;पुण्यातील 72 पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश


पुणे :रिपोर्टर
महाराष्ट्र दिनाच्या (1 मे) पूर्वसंध्येला पोलीस महासंचालक पदकांची घोषणा करण्यात आली. राज्य पोलीस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधिकारी कर्मचारी यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यात राष्ट्रपती पोलीस पदक, पोलीस शौर्यपदक आणि सन्मानचिन्हे यांचा समावेश आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सु.कु.जायसवाल यांनी ही पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची यादी जाहीर केली आहे.
राज्यातल्या एकूण 800 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पुण्यातील एकूण 72 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. पुणे शहर 32, पिंपरी चिंचवड मधील 09 ग्रामीण मधील 12 पोलीस अधिकारी कर्मचारी यांची पोलीस महासंचालक पदकांकरिता निवड करण्यात आली आहे. यात राज्य राखीव पोलिस गट, लोहमार्ग पोलीस, गुन्हे अन्वेषण विभाग, महामार्ग सुरक्षा विभाग, यांचा समावेश आहे.
पदक प्राप्त अधिकारी / कर्मचारी यांची नावे पुढीलप्रमाणे:

 उपअधीक्षक नरेंद्र किसनराव गायकवाड (लोहमार्ग पुणे), पोलीस उपअधीक्षक सुनील भगवान यादव (दहशतवाद विरोधी पथक), पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार तानाजीराव पाटील (पुणे शहर), पोलीस निरिक्षक शैलेश सुधाकर गायकवाड (पिंपरी चिंचवड), पोलीस निरीक्षक महेंद्र जयवंतराव जगताप (पुणे शहर), पोलीस निरीक्षक अनंत ज्ञानेश्वर माळी (राज्य पोलीस बल गट 2, पुणे),पोलीस निरीक्षक संतोष धनसिंग बर्गे (पुणे शहर),पोलीस निरीक्षक मनोहर अंकुश हरपुडे (गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन हरिबा मोहिते (पुणे ग्रामीण), सहायक पोलिस निरीक्षक राकेश सुरेश कदम (रागुवि, पुणे), सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय महादेव दराडे (पुणे ग्रामीण), सहायक पोकिस निरीक्षक रमेश नारायण खुणे (पुणे ग्रामीण), पोलीस उपनिरीक्षक अविनाश बाळासो ढमे (पुणे शहर), पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सुभाष अंतरकर (पुणे शहर), पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नरेश येरम (रा.पोलीस बल गट 2, पुणे), पोलीस उपनिरीक्षक मारुती परशुराम जगझापे (लोहमार्ग, पुणे), सहायक पोलिस निरीक्षक संभाजी सुधाकर नाईक (पुणे शहर), सहायक पोलिस निरीक्षक भरत नामदेव मोरे (पुणे शहर), सहायक पोलिस उपनिरीक्षक नागेश सोनू बांदेकर (रा.रा.पोलीस बल गट 2, पुणे), सहायक पोलिस उपनिरीक्षक दिलीप दशरथ पोटे (पुणे शहर), सहायक पोलिस उपनिरीक्षक शशिकांत प्रतापराव शिंदे (पुणे शहर), सहायक पोलिस उपनिरीक्षक नामदेव सिद्धनाथ राऊळ (रा.रा.गट 2 पुणे), सहायक पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र दत्तात्रय शेवाळे (पुणे ग्रामीण), सहायक पोलिस उपनिरीक्षक माणिक बाळासो पवार (पुणे शहर), सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनील जगन्नाथ यादव (रा.रा. बल गट 2, पुणे), सहायक पोलिस उपनिरीक्षक रवींद्र सोमा राठोड (पिंपरी चिंचवड), सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक नारायणराव सणस (पुणे शहर)

सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय उद्धवराव चांदणे (पुणे शहर), पोलीस हवालदार दिलीप सर्जेराव मोरे (पुणे शहर), पोलीस हवालदार संतोष रघुनाथ पागार (पुणे शहर), पोलीस हवालदार अस्लम गुलामरसूल आत्तार (पुणे शहर), पोलीस हवालदार महादेव वसंत निंबाळकर (पुणे शहर), पोलीस हवालदार मनीषा शिवाजी थिटे (गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), पोलीस हवालदार प्रदीप जितलाल शहारे (पुणे शहर), पोलीस हवालदार विनोद शांताराम झगडे (एसीबी, पुणे), पोलीस हवालदार दत्तात्रय नागनाथ स्वामी (लोहमार्ग, पुणे), पोलीस हवालदार मंदार गंगाराम कंदुल (लोहमार्ग, पुणे), पोलीस हवालदार विजय जगदीश भोसले (पुणे शहर), पोलीस हवालदार विकास विजय शिंदे (पुणे शहर), पोलीस हवालदार राजू बापूराव पुणेकर (पुणे ग्रामीण), पोलीस हवालदार धर्मराज जनार्दन आवटे (पिंपरी चिंचवड), पोलीस हवालदार राजू दगडू गायकवाड (गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), पोलीस हवालदार प्रभावती दिलीप गायकवाड (पिंपरी चिंचवड), पोलीस हवालदार राजेंद्र शांताराम शेटे (पिंपरी चिंचवड), पोलीस हवालदार जिलाणी मुसा मोमीन (पुणे शहर), पोलीस हवालदार प्रवीण रुस्तम तायडे (रारापो गट 2, पुणे), पोलीस हवालदार सुनील शिवाजी बोरकर (पुणे शहर), पोलीस हवालदार राजेंद्र केशव मेमाणे (गुन्हे अन्वेषण विभाग पुणे), पोलीस हवालदार अहमद हसन शेख (पिंपरी चिंचवड), पोलीस हवालदार अनिता अरविंद चुरी (गुन्हे अन्वेषण विभाग , पुणे), पोलीस हवालदार दिलीप सुदाम वाळके (पुणे शहर), पोलीस हवालदार संतोष बापूराव मोहिते (पुणे शहर), पोलीस हवालदार गोपाळ सदाशिव खांदवे (पुणे शहर)
पोलीस हवालदार रवींद्र एकनाथ शिनगारे (पुणे ग्रामीण), पोलीस हवालदार राकेश संभाजी गुजर (पुणे शहर), पोलीस हवालदार साक्षी ऋषिकेश मुळे (पुणे शहर), पोलीस हवालदार सचिन मोहन गायकवाड (पुणे ग्रामीण), पोलीस हवालदार निलेश बाळासाहेब कदम (पुणे ग्रामीण), पोलीस हवालदार राहुल शिवाजी शिंदे (पुणे शहर), पोलीस हवालदार सुरेश दौलत भोई (पुणे ग्रामीण), पोलीस हवालदार अजित रघुनाथ ननावरे (पुणे ग्रामीण), पोलीस हवालदार संदीप राम पाटील (एमआयए पुणे), पोलीस नाईक विनोद बाबुराव साळुंके (पुणे शहर), पोलिस नाईक अतुल शिवाजी गायकवाड (पुणे शहर), पोलीस नाईक मंगेश दत्तात्रय चव्हाण (पुणे शहर), पोलीस नाईक दीपमाला नंदकुमार लोहकरे (पिंपरी चिंचवड), पोलीस नाईक संदीप प्रकाश दुबे (महामार्ग सुरक्षा पथक, पुणे), पोलीस नाईक सुधीर अंकुश इंगळे (पुणे शहर), पोलीस नाईक प्रमोद परशुराम नवले (पुणे ग्रामीण), पोलीस नाईक मंगेश तुकाराम नेवसे (पुणे ग्रामीण), पोलीस नाईक शशिकांत नारायण पवार (पुणे शहर), पोलीस नाईक दत्तात्रय मारुती बनसुडे (पिंपरी चिंचवड), पोलीस नाईक संदीप मारुती होळकर (पिंपरी चिंचवड) यांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या