उस्मानाबाद जिल्ह्यातील आनखी 6 पाॅझिटिव्ह सापडले

उस्मानाबाद :रिपोर्टर
  
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या  संख्येत आणखी 6 जणांची रविवारी भर पडली आहे. उस्मानाबाद येथे 2 उमरगा 3 तर परंडा तालुक्यात 1 रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची दिवसेंदिवस अधिकच वाढ होत असल्याचे दिसत आहे. यापूर्वी 29 आणि रविवारी आढळून आलेले 6 अशी कोरोनाबाधितांची संख्या आता 35 वर गेली आहे. 

उस्मनाबाद जिल्ह्यातील 47 जणांचे तपासणी अहवाल रविवारी प्राप्त आहेत. यामध्ये उस्मानाबादेत 19 वर्षाच्या तरुणासह 30 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उमरगा तालुक्यात 2 महिला आणि एक परुष तर परंड्यात 55 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली. आहे. उर्वरित 35 जणांचे अहवाल निगेटिव्ह असून 6 संदिग्ध आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ चिंताजनक आहे. एक रुग्ण स्मानाबाद शहरातील देशपांडे स्टॅन्ड, जोशी गल्ली येथील असून तो, सोलापूर रिटर्न आहे. दुसरा धुता येथील 30वर्षीय महिला असून मुंबई रिटर्न आसल्याचे समजते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या