उस्मानाबाद,तुळजापूर नगरपालिका क्षेत्रात 31 मे पर्यंत लॉकडाउन कायम:जिल्हाधिकारी यांचे आदेश


रिपोर्टर: उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर व उस्मानाबाद नगर पालिका क्षेत्रामध्ये करोनाचे रूग्ण आढळून आल्याने दोन्ही शहरातील नगरपालिका परिसरामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता 31 मे पर्यंत लॉकडवून कायम राहील आसे आदेश उस्मानाबाद च्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ,मुंडे यांनी दिले आहेत.   

कोरोनाचा प्रभाव थांबवण्यसाठी उस्मानाबाद,तुळजापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये शासकीय/निमशासकीय कार्यालये,पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना,सर्व बँका,दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना,अन्न, भाजीपाला, दूध.
किराणा पुरविणाऱ्या आस्थापना.सकाळी 8 ते दुपारी 2 या कालावधीतच सुरू राहतील त्याच बरोबर दवाखाने, वैद्यकीय केंद्र व औषधी दुकाने,
विद्युत पुरवठा,ऑईल व पेट्रोलियम व ऊर्जा संसाधने,प्रसार माध्यमे, मीडिया,अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आय.टी.आस्थापना.वरील आस्थापना व दुकाने वगळून उस्मानाबाद व तुळजापुर नगर पालिका क्षेत्रातील सर्व आस्थापना व दुकाने दिनांक 31 मे 2020 पर्यंत बंद करणेबाबत आदेशित करीत आहे.
सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच उपरोक्त  क्रमांक 2 मधील महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 नुसार, भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदींनुसार दंडनीय/कायदेशीर कारवाई केली जाईल आशा प्रकारे जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले आहेत.सदर आदेशाची अंमलबजावणी दिनांक 20 मे 2020 पासून तात्काळ लागू करण्यात करण्यात आली असुन 31 मे पर्यंत कायम रहातील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या