कंटेन्मेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत वाढण्यात आला लॉकडाऊन



 रिपोर्टर:  देशात कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याच प्रमाणे जून महिन्यातही कोरोनाचा प्रदुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊन 5.0 साठी नवी गाईडलाईन जाहीर केली आहे.

8 जूननंतर कंन्टेमेट झोनशिवाय इतर ठिकाणी राज्य सरकारने स्थानिक परिस्थिती विचारात घेत शाळा कॉलेज याचा विचार करावा अथवा पुन्हा जून अखेर आढावा घेऊन जुलै महिन्यात सुरू करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
8 जूनपासून आणखी काही बाबी शिथिल करण्यात आल्या आहेत. ज्यानुसार धार्मिक स्थळे, मॉल्स, हॉटेल्स ८ जूनपासून उघडणार आहेत. मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळणे अनिवार्य असणार आहे तसेच मास्क घालणेही अनिवार्य असणार आहे. असेही केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. ३० जून पर्यंत फक्त कन्टेन्मेन्ट झोनमध्ये लॉकडाउन कायम राहिल.
लॉकडाउन 5.0 संदर्भात केंद्र सरकारकडून महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाउन संदर्भात नवीन मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. लॉकडाउन आता फक्त कन्टेन्मेन्ट झोनपुरता मर्यादीत राहणार आहे. टप्याटप्याने सर्व आर्थिक व्यवहार सुरु होतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या