वाशी तालूक्यातील पिंपळगाव येथिल ते दोन रिपोर्ट पाॅझिटिव्ह: जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 25 कडेरिपोर्टर तालुक्यातील पिंपळगाव येथिल मुला बरोबर आता त्याचे आई वडील ही पाॅझिटिव्ह असल्याची माहीती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आहे.त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा आता 25 वर पोहचला असुन वाशी तालुक्यातील गावे सिल करण्यात आली आहेत.तिन्ही रुग्णांना पुढील उपचारासाठी कळंब येथिल शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
कोरोनाचा वाशी तालुक्यात मुंबईमार्गे प्रवेश झाल्याने  तालूक्यातील यंञना सतर्क झाली आहे. उस्मनाबाद जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्री प्रलंबित असलेले आवहार शुक्रवारी दुपारी प्राप्त झाले असुन   त्या अहवालात ६ कोरोणा बोधिताची संख्या जिल्ह्यात वाढलेली  होती  परंतु आनखी दोन रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले आहेत. वाशी तालुक्यातील पिंपळगाव (लिंगी ) या गावातील एक नागरिक कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते.माञ त्याच्या आई वडीलांचे रिपोर्ट येणे बाकी होते.
  वाशी तालुक्यातील पिंपळगाव ( लिंगी ) येथील कोरोना बाधित  कुटूंब हे  ६ व्यक्ती व१ वहान चालक एका स्वतंत्र वाहनाने मुंबई येथील .जोगेश्वरी या ठिकाणावरून वाशी तालुक्यात बुधवार (दि-२० मे ) रोजी आले होते . त्या कुटुंबानी वाशी ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून पिंपळगाव (ली ) या गावी जाण्याचा निर्णय घेतला होता . व तपासणी करून गावाकडे जात असतानाच. वाशी नगरपंचायतचे नगराध्यक्ष -नागनाथ नाईकवाडी यांना हे  कुटुंब कोरोना संशयित  असल्याची माहिती मिळाल्यामुळे. त्यांनी वाशी ग्रामीण रुग्णालयात दूरध्वनीद्वारे संपर्क करून या रुग्णांच्या विषयी माहिती दिल्यानंतर लगेच वाशी ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याने त्या कुटुंबांना कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या वस्तीग्रहामध्ये कॉरान्टांईन कक्षा मध्ये ठेवण्यात आले होते.  त्या मधील.  गुरूवारी ३ व्यक्तीचे रिपोर्ट अहवाल  तपासणीसाठी लातुर येथे पाठवले होते. त्यामध्ये ६ वर्षीय मुलाचा रीपोर्ट पॉझिटिव्ह निघाला  होता  व २व्यक्ती निगेटिव्ह निघाले आहेत. व ४ जणांचे अहवाल येणे बाकी होते.ते आवहाल शुक्रवारी दुपारी प्राप्त झाले. त्यामुळे वाशी तालुक्यात मुंबई येथून कोरोणाचा प्रवेश झाल्याने, वाशी तालुक्यात आता तिन  रुग्ण कोरोना पॉझीटीव सापडले आहेत.
  तालुक्यात तिन कोरोना रुग्ण सापडल्याने अनेक गावच्या ग्रामपंचायतीने गावात नाकाबंदी करूण गाव सुरक्ष रहाण्याची काळजी घेतली जात आहे. गावात प्रवेश करणाऱ्या रोडवर लाकडे बांधून गावात बाहेर गावच्या नागरीकाला प्रवेश नाकारला जात आहे. तसेच वाशी शहरात नाका बंदी करुण गावातील मेडीकल दुकाणे वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. त्या मूळे वाशी शहरात शुकशुकाट पसरला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या