घरपोच दारू विक्रीला राज्य सरकरची परवानगी:14 तारखेला होणार सुरूवात:


राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी १४ तारखेपासून मद्याची घरपोच सेवा देण्यास सुरुवात होईल अशी माहिती दिली आहे. मात्र यावेळी काही अटी आणि नियम ही लागू करण्यात आले आहेत. फक्त परवाना असणाऱ्या मद्य दुकानांना ही सेवा देता येणार आहे. सोबतच ज्यांच्याकडे परमिट आहे त्यांनाच ही सेवा घेता येणार आहे. तसेच घरपोच सेवा देण्याची जबाबदारी मद्य दुकानाच्या मालकावर असणार आहे. याशिवाय डिलिव्हरी बॉयची वैद्यकीय तपासणी आवश्यक असणार आहे अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या