एसबीआय कडून कर्जदार शेतकरी व बचत गटासाठी 10 टक्के अतिरिक्त कर्ज योजना      रिपोर्टर: भारतीय स्टेट बँकेने जिल्ह्यातील स्टेट बँकेचे सर्व कर्जदार शेतकरी सभासद व महिला बचत गटांसाठी दहा टक्के अतिरिक्त कर्ज योजना सुरू केलेली आहे.

     तरी या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व सभासद शेतकरी व महिला बचत गटांनी घ्यावा. असे आवाहन स्टेट बँक ऑफ इंडियाचे रिजनल मॅनेजर संजय हडके यांनी केले आहे.

     सद्यस्थितीमध्ये शेतकऱ्यांसमोर अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा या कठीण प्रसंगी भारतीय स्टेट बँकेने सर्व नियमित कृषी कर्जदार सभासद आणि महिला बचत गटांनी घेतलेल्या कर्ज मर्यादेवर अतिरिक्त 10 टक्के कर्ज मंजुरीची घोषणा केलेली आहे.

     या योजनेचा लाभ घेण्यासाठी व योजनेविषयी अधिक माहितीसाठी भारतीय स्टेट बँकेच्या आपल्याशी संबंधित शाखेची संपर्क साधावा असे आवाहनही हडके यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या