1 जून पासुन संपावर जाण्याचा स्वस्त धान्य दुकानदारांचा ईशारा

रिपोर्टर:कोरोनाचा वाढता आलेख पाहता जिल्हयातील स्वस्त धान्य दुकानदार आणि मदतनिस यांना विम्याचे संरक्षण देण्यात यावे नाहीतर 1 जुन पासुन माल खरेदी आणि वितरण बंद ठेवण्यात येईल आशा आशयाचे निवेदन जिल्हा स्वस्त धान्य दुकान संघटनेने जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

उस्मानाबाद येथिल जिल्हा स्वस्त धान्य दुकान संघटने ने कोरोनाचा प्रभाव सुरू झाल्यावर एप्रिल महिण्यात प्रशासनाकडे विमा संरक्षणाची मागणी केली होती.कोरोना चा वाढता संसर्ग पाहता स्वत धान्य दुकानदार आणि एक मदतनिस यांना विमा संरक्षण देण्यात यावे या आनुशंगाने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले हाते. परंतू या मागणीची दखल शासनाने घेतली नसल्याने स्वस्त धान्य दुकानदार 1 जुन पासुन मालाची खरेदी आणि वितरण बंद करणार आहेत.आशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना जिल्हा स्वस्त धान्य दुकान संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या