वाढदिवस साजरा न करता कुमारी मानसी मोटेची मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत:


रिपोर्टर 
कुमारी मानसी मोटे हीने आपला वाढदिवस साजरा न करता कोवेड-१९ मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच हजार रुपयाची मदत केली आहे.   
आपली तशी रोजच  आठवण मला येते.कसे आहात? आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेत असणारच.नव्हे ती घ्यायलाच हवी.येणारा काळ आपल्या सर्वांसाठी आरोग्यदायी लाभो!
लवकरच आपण सर्वजण या परिस्थितीतून बाहेर येवू,काळजी घ्या,सुरक्षित रहा.आपल्या सर्वांना मला सांगण्याचा अधिकार नाही,पण मी  आपणास हात जोडून विनंती करीते की, आपण व आपल्या कुटुंबातील कोणीही कारण नसताना घराच्या बाहेर पडू नका.आपल्या रक्षणासाठी सर्व लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी,डॉक्टर,नर्स, पोलिस,सैनिक,सिक्युरिटी स्टाफ,आरोग्य सेवक,अंगणवाडी सेविका-मदतनीस, आशाकार्यकर्ती,पत्रकार (मिडीया)व सर्व विभागांच्या आस्थापनेवरील स्टाफ हा आपल्याच सेवेसाठी जीवाचे रान करीत कष्ट घेत आहेत.स्वतःच्या हातून जेव्हां एखादया गरजवंताचे काम होते,तेव्हां त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते,तोच आपल्या जीवनातील सर्वांत मोठा सन्मान आणि सत्कार असतो.माणुसकीने वागणे आणि प्रेमाने बोलणे हाच खरा धर्म म्हणून मी वडीलांचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम जवळून पहाता आले त्यांचे डॉ.दाभोलकरांचे अंनिस कार्यकर्ते म्हणून काम करताना मी हे पहात पहात समजूत घेत गेले.माझं जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिकणं वडीलांच्या कर्तव्यापोटी असावं असं मी मानते.माझ्या आई-वडीलांच्या संस्कारामुळेच आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली मी आयुष्याची वाटचाल यशस्वीरित्या पूर्ण करीत आहे.सध्या आपल्या देशावर कोरोना विषाणूमुळे जे भयानक संकट आले आहे.या संकट प्रसंगी माणूस म्हणून माझा ही खारीचा वाटा असला पाहिजे आणि एक आठवण राहावी व सामाजिक बांधीलकी म्हणून मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने जो खर्च होतोे.तो खर्च मी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोवेड-१९ कारिता आज ता.९ (गुरुवार)रोजी मी ऑनलाईन पाठवून दिले.हे कार्य केल्याचे एक वेगळेच समाधान मला मिळाले.मी घेतलेला संकल्प मला या निमित्ताने पूर्ण करता आला.वाढदिवस पुन्हा येणार आहे.तो पुन्हा करता येऊ शकतो. पण संकटाच्या वेळी मदतीला धावून जायला हवे हा विचार मनी आला.दररोजच्या जगभरातील बातम्यानी तो पक्का केला.म्हणून वाढदिवसाच्या खर्चाचे पैसे मुख्यमंत्री निधीसाठी द्यायचे हा निर्णय घेतला. मला या प्रसंगी एक गोष्ट आठवते.एकदा काय झाले,एका जंगलाला आग लागलेली असते,ती आग विझविण्याचा प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत होते,त्यात चिमणीही आपल्या चोचीत पाणी आणायची आणि आगीत टाकायची तर तीला बाकीचे हसले व म्हणाले एवढ्याशा पाण्याने आग थोडीच विझणार आहे.तेव्हा चिमणीने उत्तर काय दिले ते फार महत्वाचे आहे,मी आणलेल्या पाण्याने आग नक्कीच विझणार नाही पण माझे नाव आग लावण्याच्या यादीत न येता ते आग विझविण्याच्या यादीत असेल तसेच आज झाले आहे मी घरात राहिले तर काय होणार?तर आपले नाव कोरोना पसरविण्याच्या यादीत न येता,कोरोना थांबविण्याच्या यादीत असेल.मग ठरवा आग लावायची की विझवायची.थांबला तो संपला,असे म्हणण्यापेक्षा थांबला तो जिंकला.असेच आज म्हणावे लागेल.मी सध्या बी.एस्सी.भाग-३ वर्गात शिक्षण घेत आहे.जसे म्हणतात की,एखादे पुस्तक एखादयाच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकते.एक पान एखादयाचे आयुष्य बदलू शकते आणि एक वाक्य एखादयाच्या आयुष्याचं ध्येय ठरवू शकते.एवढी ताकद वाचनात व अभ्यासात असते. तेव्हा हसता हसता दुःख विसरुन जाणे हेच जीवन आहे.भेटून तर सर्वजण आनंदी होतात.पण न भेटता ही नाती जपणं हेच खर जीवन आहे.शेवटी काय चांगली भूमिका,चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात. मनातही,शब्दांतही आणि आयुष्यातही......     या प्रसंगी सर्व वडीलधाऱ्या मंडळीकडून जे प्रोत्साहन व प्रेरणा मिळते तेच मला ऊर्जा  निर्माण करणारे ठरतील. आपलीच   कुमारी मानसी महेश मोटे                     बी.एस्सी.भाग-३  दयानंद विज्ञान महाविद्यालय,लातूर,ता.जि.लातूर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या