श्री.काळ भैरवनाथ अन्नछत्र ट्रस्ट तर्फे ४० दिवसांपासून केली जातेय माकडांच्या खाण्याची सोय

परंडा रिपोर्टर:सुरेश बागडे 


लाखो भक्ताचे श्रध्दास्थान असणारे, अखंड महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गोवा येथील असंख्य लोकांचे कुलदैवत असलेले श्री क्षेत्र सोनारी येथील भैरवनाथ मंदिर व मंदिर परिसरात साधारणपणे २००० ते  २५०० माकडांची संख्या आहे,
हे माकड म्हणजेच श्री काळभैरवनाथांची सेना म्हणून संपूर्ण भावीकांमध्ये परीचीत आहे, परंतु सध्या संपूर्ण जगभरासह आपल्या भारतात व महाराष्ट्रात देखील कोरोना विषाणू चा धोका वाढत असल्याने, पूर्ण भारतभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे, संचारबंदी लागू असल्याने मंदिरे देखील बंद करण्यात आले आहे असून, सोनारी येथील श्री. काळ भैरवनाथ दर्शनासाठी येणारे भाविक येताना मकडांसाठीही खाण्याच्या वस्तू  घेऊन येत असे, परंतु संचारबंदी लागू असल्याने भावीक येत नसल्याने भैरवनाथांची सेना असलेली माकडे उपासमारीचे शिकार होत आह़ेत हे लक्षात घेऊन श्री भैरवनाथ अन्नछत्र ट्रस्ट चे अध्यक्ष महेश कारकर यांनी अन्नछत्र ट्रस्ट मार्फत माकडांना खाण्याची व  पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे ठरवून त्या अनुषंगाने गेली ४० दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, केळी, टोमॅटो, कलिंगड, काकडी, टरबूज, शेंगदाणे, गहु ,तांदुळ, फुटाणेटाकण्यात येत आहेत, प्राणीसेवा हिच ईश्वरसेवा समजुन हे कार्य चालु असुन दिवसातुन सकाळी ८वाजता , दुपारी १२वाजता व नंतर ४ वाजता वेगवेगळे खाद्य देण्यात येते, माकडांना पिण्याच्या पाण्यासाठी वेगवेगळ्या १४ जागेवर सिमेंट च्या टाक्या ठेवण्यात आल्या आहेत, गेली ३ वर्षांपासून अन्नछत्र ट्रस्ट मार्फत अन्नदान व वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत, हे कार्य करण्यासाठी बाहेरील भैरवनाथ भावीक देखील शक्य त्या पद्धतीने मदत करत असल्याचे अन्नछत्र चे सहसचिव अशोक माने यांनी सांगितले.
 हे प्राणीसेवेचे कार्य करण्यासाठी अन्नछत्र चे अध्यक्ष महेश कारकर व सचिव प्रकाश जगताप ,नाशीक येथील भैरवनाथ भाविक श्री अभिजीत खरे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक माने, रवींद्र खुळे, भिमा घाडगे, सागर वायकर, मतीन तांबोळी, सुनील गुळमीरे, बाहुबली वायकर, राहुल काळे, अभिजीत काळे, सज्जन गोसावी, विजय ईटकर, हुसेन शेख, बबलू शिंदे, गोट्या वाडेकर, तसेच अन्नछत्र ट्रस्ट मित्र परिवार सहकार्य करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या