बक्षिसातुन जमा झालेली रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला. इयत्ता तिसरीत असलेल्या वसुंधरा गुरव चा स्तुत्य उपक्रम..


रिपोर्टर: अगदी खेळण्या बागडण्याच्या वयात देखील आपल्या हातून देशसेवा घडावी या देशप्रेमाच्या शुद्ध भावनेनेपोटी उस्मानाबाद शहरातील मराठी कन्या प्रशालेतील इयत्ता तिसरी च्या वर्गात शिकणाऱ्या कुमारी वसुंधरा संजय गुरव या चिमुकलीने आपल्या वक्तृत्व कलेच्या माध्यमातून विविध स्पर्धांमध्ये क्रमांक पटकावून जमा झालेली रुपये 3300 व आई-वडिलांनी वेळोवेळी खाऊसाठी दिलेले,गल्यात जमा करून ठेवलेले 1700 रुपये असे एकूण रक्कम रुपये 5000/- चा निधी कोरोना विरुद्ध च्या लढाईसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा केला आहे. ही रक्कम वसुंधरा गुरव हिने स्वत:जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे सुपूर्द केला.अगदी छोट्याश्या वयामध्ये असून देखील वसुंधराने केलेल्या या कार्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी तिचे कौतुक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या