येडशी आणि ढोकी मोडवर वाढली तळरामांची गर्दी: रिपोर्टर: उस्मानाबाद जवळील आळणी फाटा आणि येडशी येथे लॉकडाउन असताना ही तळीरामांची सोय होताना दिसत आहे.या दोन्ही ठिकाणी चडया भावाने दारूची विक्री होत आसल्याने लॉकडउनमध्ये दारू पिण्यासाठी निराश झालेले मदय लोभी या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउनमध्ये दारूची दुखाने ही बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकार कडुन देण्यात आले आहेत.त्यामुळे दारू विक्रेते आणि दारू पिणारांचा पुरता नाईलाज झाला आहे.परंतु लॉकडाउन आसतानाही उस्मानाबाद तालुक्यातील येडशी आणि आळणी फाटयावरील काही हॉटेलमध्ये चडया भावाने दारू विकली जात आसल्याची माहीती समोर आली आहे.या परिसरातील लोक आळणी फाटा येथे जवून दारू घेवून येत असुन लॉकडाउन आणि संचार बंदीचे उल्लघन करताना दिसत आहेत.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या ठिकाणच्या दारू विक्रेत्यावर कारवाई करावी आशी मागणी काही समाजसेवका कडुन केली जात आहे. 

   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या