देशावर आलेल्या संकटात ही आमदार सुजितसिंह ठाकुर यांचा बेजबाबदारपणा: गुन्हा दाखल करण्याची मागणी

रिपोर्टर: संपुर्ण देशात लॉकडाउनमुळे मंदिर,​मसिदी बंद केलेल्या असताना आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी पंढरपुर येथे विठठलाच्या मंदीरात जावून चैत्री वारीची शासकीय पुजा केली.संचार बंदीचे उल्लघंन आणि देशावर आलेल्या कोरोना सारख्या माहामारी मध्ये ही बेजबाबदार पणे वागल्यामुळे आमदार ठाकुर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सोलापुर येथिल राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
देशावर आलेले कोरोना महामरीचे संकट पहाता सर्वांनीच जबाबदारीने वागावे असे केंद्र व राज्यरकार वारंवार सांगत आसताना आमदार ठाकुर यांनी विठठलाच्या मंदीरात जावून शासकीय पुजा करणे योग्य नसल्याचे सोलापुर राष्ट्रवादी युवक कॉग्रेसने दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.त्याच बरोबर आमदार ठाकुर यांची पांडुरंगा बददलची भक्ती लॉकडाउनमध्येच का ओसंडुन वाहिली असा प्रश्नही राष्ट्रवादी युवक   कॉग्रेसने उपस्थित केला आहे. 
कारोनाच्या पार्श्वभुमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे श्री विठ्ठल -रुक्मिणीचे  मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. मात्र मंदीरामध्ये सर्व नित्योपचार सुरु आहेत.लॉकडाऊनमुळेच यंदाची चैत्री पौर्णिमा यात्रा भरली नाही.आगदी प्रतेक एकादशीला पाडुरंगाचे दर्शन घेणारे विठठलाचे भक्त सुध्दा चैत्री वारीला पंढरपुरला येवू शकले नाहीत.असे असताना, शनिवारी पहाटे चैत्री पौर्णिमेची शासकीय महापूजा भाजप आमदार आणि मंदिर समितीचे सदस्य सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आली, यावेळी संभाजी शिंदे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदिंची उपस्थिती होती.
लॉकडाऊनचे नियम तोडल्यामुळे आ.सुजितसिंह ठाकूर, उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदीप मांडवे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या