तळीरामा पासुन सुटका दया! पोलीसाकडे तक्रार करूण कंटाळलेल्या ग्रामस्ताचा फोन माध्यमाच्या कार्यालयात:
 रिपोर्टर: आळणी शिवारातील रेल्वे लाईन जवळील पारधी वस्ती येथे राजरोज पणे गावठी दारू आणि गाजा विक्री सुरू असुन कोरोनाच्या धास्तीने गाव सोडून मुलाबाळासह शेतात रहाण्यासाठी गेलेल्या शेतक—यांना या संगळया गोष्टीचा हाकनाक त्रास सहन करावा लागत आहे.वारंवार पोलीसात तक्रार करूण ही दख्खल न घेतल्याने ग्रामस्तानी माध्यमाच्या कार्यालयात संपर्क करूण दारूडया पासुन आम्हाला सुटका दया असे म्हणने मांडले.

कोरोनाच्या धास्तीने ग्रामीण भागातील लोक गावात न रहाता शेतामध्ये राहूण संचार बंदीचे नियम पाळताना दिसत आहेत.परंतू गाव सोडून शेतात राहाण्यासाठी गेलेल्या काही ग्रामस्ताना दारूडयांचा त्रास सहन करावा लागत आहे.तालुक्यातील आळणी गावातील काही ग्रामस्त कोरोनाच्या भितीमुळे आपल्या मुलाबाळासह शेतातील वस्तीवर राहाण्यासाठी गेले आहेत.मात्र शेतालगतच असलेल्या पारधी वस्तीवर राजरोस पणे देशी दारूची निर्मीती आणि विक्री जोरात चालत आहे.त्यामुळे परिसरातील मध्यप्रेमी या ठीकानी गर्दी करत आहेत.दारू पिवून गोंधळ आणि गर्दी करूण संचार बंदीच्या नियमाचे उल्लंघन ही या ठिकाणी केले जात आहे.कोरोना सारखा भयंकर संसर्ग संगळीकडे फैलावत असुन या प्रकारामुळे या ठिकाणी रहाणा—या शेतक—यांना सुध्दा    धोका पत्कारावा लागणार आहे.आळणी गावातील ग्रामस्तानी वारंवार ही बाब पोलीसांच्या निदर्शनास अनुन दिली आसताना सुध्दा या लोकांवर कारवाई का होत नाही.हा मोठा प्रश्न आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या