आमदार सुजितसिंह ठाकुर विरोधात राष्ट्रिय आपत्ती कायद्यान्वे गुन्हा दाखल.: रिपोर्टर    संगळा देश कोरोना विरोधात लढा देत आसताना विधान परिषदेचे आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी चैत्री एकादशी दिवशी पंढरपुर येथे विठठलाची शासकीय पुजा केली.त्यामुळे आमदार ठाकुर यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लघंन केल्याचे राष्ट्रवादी युवक कॉगेसच्या कार्यकर्त्यांनी पोलीसांच्या निदर्शनास आणुन दिले होते.त्यानुसार आमदार ठाकुरसह मंदिर समीतीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रीय आपत्ती कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
संपुर्ण देशात लॉकडाउनमुळे मंदिर,​मसिदी बंद केलेल्या असताना आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी पंढरपुर येथे विठठलाच्या मंदीरात जावून चैत्री वारीची शासकीय पुजा केली.संचार बंदीचे उल्लघंन आणि देशावर आलेल्या कोरोना सारख्या माहामारी मध्ये ही बेजबाबदार पणे वागल्यामुळे आमदार ठाकुर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशावर आलेले कोरोना महामरीचे संकट पहाता सर्वांनीच जबाबदारीने वागावे असे केंद्र व राज्यरकार वारंवार सांगत आसताना आमदार ठाकुर यांनी विठठलाच्या मंदीरात जावून शासकीय पुजा करणे योग्य नसल्याचे सोलापुर राष्ट्रवादी युवक कॉग्रेसने पोलीसांच्या निदर्शनास आनुन दिले होते.आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे कलम 269,270,188,तसेच अधिनियमन 2005 चे कलम 51 ब,व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37,3,135 तसेच रोग प्रतिबंधक अधिनियम 1897 2,3 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या