पंतप्रधान रोजगार निर्मीती योजनेचे टार्गेट पुर्ण न करणा—या बॅंक व्यवस्थापकावर गुन्हे नोंद करण्याची मागणी:रिपोर्टर:आकांक्षीत उस्मानाबाद जिल्हयातील 2019,20 या वर्षाच्या पंतप्रधान रोजगार निर्मीती योजनेचे टार्गेट पुर्ण न करणा—या सरकारी बॅंक व्यवस्थापकावर गुन्हे नोंद करण्याची मागणी जिल्हयातील उदयोजक आणि सुशिक्षीत बेरोजगारांनी सुक्ष्म,लघु व मध्यम उदयोगमंत्री नितीन गडकरी यांच्या कडे एका निवेदनाव्दारे केली आहे.   

उस्मानबाद जिल्हा हा आकांक्षीत जिल्हयाच्या यादीमध्ये असुन या ठीकानी बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे म्हणुन केंद्र सरकारने आनेक प्रभावी योजना राबवल्या आहेत.परंतु या योजना आमलात आनण्यासाठी ग्रामीण भागातील ग्रामीण भागातील नव उदयोजकांना बॅंका सहकार्य करत नसल्याने ग्रामीण भागात छोटे मोटे उदयोग उभारण्यास आडचनी येत आहेत.
या योजने करिता बॅंकाना उदयोग मंत्रालायाकडुन लक्षांक दिला जातो.मात्र या आदेशाला बॅंका केराची टोपली दाखवतात.वर्ष 2017,18 या आर्थिक वर्षामध्ये अर्जदारांनी दाखल केलेल्या प्रस्तावाची छाननी करूण पंतप्रधान रोजगार निर्मीती योजनेच्या जिल्हास्तरिय समितीने 614 प्रस्ताव शिफारशिनुसार संबंधित बॅंकांना पाठवले होते.परंतु त्यातुन केवळ 78 व्यक्तींना बॅंकांनी कर्ज दिले.
त्याप्रमाणेच आर्थिक वर्ष 2018,19 मध्ये 846 पैकी 127,वर्ष 2019 ,20 मध्ये 594 पैकी 93 व्यक्तीना बॅंकोनी कर्ज दिले.ही सर्व परिस्थिती पाहीली तर पंतप्रधान रोजगार निर्मीती योजनेचा लक्षांक पहाता फक्त 15 टक्केंच लोकांना या योजनेचा फायदा मिळत आहे.याला सरस्वी जबाबदार संबंधिक बॅंक व्यवस्थापक असल्याचे दिसत आहे.तरी केंद्रीय उदयोग मंत्री नितीन गडकरी यांनी आशा नालायक बॅंक व्यवस्थापकांवर कारवाई करावी आशा प्रकारचे निवेदन उस्मानाबाद जिल्हयतील नवउदयोजकांकडुन देण्यात आले आहे.या निवेदनावरती मोठया संख्येने उदयोजक आणि सुशिक्षीत बेरोजगारांच्या सहया आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या