रिपोर्टर:शहरातील गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून कितीही कडक नियमाची आमंलबजावनी केली तरी शहरात ठरावीक ठिकाणी गर्दी झालेली दिसत आहे.या गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोका नाकारता येत नाही.नागरीक सांगुन देखील एैकत नसल्याने शहरातील गल्ली वाईस सम विषम तारखेचा उपक्रम हा चांगला पर्याय होवू शकतो असे म्हटले तरी अतिशोक्ती होणार नाही.
उस्मानबाद शहरामध्ये बार्शी नाका,देशपाडें स्टॉंड,भाजी मंडई,नेहरू चौक आशा वर्दळीच्या ठिकाणी सकाळी सोशल डिस्टंन्स आणि संचार बंदीचे कुठलेच नियम पाळले जात नाहीत.पोलीस प्रशासनाच्या वतीने सारखं सारखं सांगुन देखील नियमाची पायमल्ली होताना दिसत आहे.त्यातुनच जवळच असलेल्या सोलापुर जिल्हयामध्ये दिवसेंदिवस कोरोना ग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे.जिल्हा बंदी असली तरी चुप्या मार्गाने लोकांचा शिरकाव चालुच असल्याचे दिसत आहे.ही संगळी धोक्याची परिस्थिती पहाता उस्मानबाद शहरा सह जिल्हयातील बाजारपेठेच्या शहरामध्ये सकाळी भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करताना दिसत आहेत.या संगळया धोक्याच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी अतिआवश्यकता सोडून शहरातील प्रतेक गल्लीला एक दिवस आड करूण बाहेर निघण्याचे नियम दिले तर शहरात होणा—या गर्दीवर मात करता येवू शकते.
0 टिप्पण्या