याला म्हणतात सामाजिक बांधिलकी: दिव्यांग महिला कर्मचारी काळे यांची कोरोना सकंट ग्रस्तांना मदत:
रिपोर्टर: कोरोनाच्या संकट काळात बरेच सामाजिक बांधिलकी जपणारे लोक निदर्शनास आले. स्वत:दिव्यांग आसतानाही समाजाचे काही तरी देणे लागतो या उददेशाने एका शासकीय दिव्यांग महिला कर्मचारी यांनी आपल्या परिने गरजूंना किराणा मालाच्या किटचे वाटप केले.

उस्मानबाद तालुक्यातील सिध्देश्वर वडगाव येथिल शासकीय सेवेत असलेल्या दिव्यांग भगिनी श्रीमती आशा कांबळे यांनी कोरोनामुळे उपासमारीच्या संकटात सापडलेल्या लोकांना मदत केली.
आज सगळे जग कोरोना व्हायरस साथीच्या विळख्यात सापडले आहे. गोरगरीब लोक काम नसल्याने उपाशी पोटी आहेत.हे एक विदारक सत्य आहे .मी ही एक दिव्यांग आहे.म्हणून मी काही दिव्यांग लोकांना व इतर गरीब गरजू व्यक्तीला किराणा सामानाची किट देऊन मदत केली आहे.मागील काही महिन्यांपूर्वी उस्मानाबाद शहरात सुलाखे परिवारातील दिव्यांग बहीण भाऊ त्यांची आई वारल्यामूळे अनाथ झाले आहेत त्यांना मी माझ्या परिने थोडीफार अर्थिक मदत केली होती.मी दिव्यांग असल्यामुळे आणि लॉकडाउन असल्याने ही मदत लोकांपर्यत कोण पोहचवणार हा प्रश्न मला पडला होता. परंतु त्यावेळी आमच्या गावात येवून त्या गरजूंपर्यंत मदत पोहचवण्याचे काम नगर परिषद बांधकाम विभागाचे सभापती व गटनेते युवराज नळे बप्पा यांनी केले. माझ्या विनंती वरून ते वडगांव (सिं.) येथे आले.किराणा सामान जरी मी स्वखर्चाने घेतले असले तरी गरजूं पर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी आपली स्वतःची चार चाकी गाडी घेऊन सामान पोहचवण्यासाठी मदत केली.तरी सर्वांना माझी विनंती आहे की, या कोरोनाचे संकट नाहीसे होई पर्यंत  आपल्या जवळ आजूबाजूला कोणी गरीब उपाशी असतील तर आपल्या इच्छेनुसार मदत करण्याचा प्रयत्न करा. असे म्हणने श्रीमती आशा कांबळे यांनी महाराष्ट्र लाईव्ह शी बोलतांना मांडले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या