मद्यविक्री सुरू करण्याबाबत दोन दिवसात निर्णय घेवू: आरोग्य मंत्र्यांचे ट्विट रिपोर्टर: लॉकडाऊनमधून सूट देण्यात आलेल्या यादीत मद्य विक्रीच्या दुकानांचा समावेश नसला तरी याबाबत काटेकोर नियमावली तयार करूनच निर्णय घेतला जाईल. यावर येत्या एक ते दोन दिवसात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहीती दिली आहे.   राज्यात लॉकडाऊन जारी झाल्यानंतर मद्य विक्रीची दुकाने बंद झाली, मात्र यामुळे मद्यप्रेमींचा संयम सुटला. राज्याच्या अनेक भागात दारूची दुकाने बिअर शॉपी व परमिट रूम फोडण्यास सुरुवात झाली. एका रात्रीत वाईन शॉपच्या भिंतींना भोक पाडून आतील दारूच्या बाटल्या पळवण्यास सुरूवात झाली. एका परमिट रूममधील चोरट्यांनी दारूच्या बाटल्या पळवल्या पण हॉटेल मधील रोख रकमेला हात लावला नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ लागला आहे. तरी ही मद्याचा समावेश अत्यावश्यक वस्तूंमध्ये होत नसल्याने मद्याची दुकाने सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली नाही.परंतू आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या बाबात दोन दिवसात निर्णय घेवू आशी माहीती दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या