सुनावणीला बनियनवर हजर झालेल्या वकिलाच्या अशिलाची शिक्षा झाली कमी!

रिपोर्टर: सध्या देशभरात लॉकडाऊनमुळे अनेकजम वर्क फ्रॉम होम करत आहेत. न्यायालये देखील बंद असल्यामुळे फक्त काही महत्त्वाच्या व तत्काळ सुनावण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेतली जात आहे. असे असताना जयपूरमध्ये एका सुनावणीच्या वेळी वकिल चक्क बनियन घालून सुनावणीसाठी हजर झाल्याने खळबळच उडाली. रविंद्र कुमार पालिवाल असे त्या वकिलाचे नाव असून त्याच्या या विचित्रपणाचा त्याच्या अशिलाला फायदाच झाला आहे. न्यायमूर्तींनी त्याच्या अशिलाच्या शिक्षेवरील सुनावणी पुढे ढकलली आहे.

आरोपी लालाराम याला आज न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात येणार होती. त्यासाठी न्यायालयाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घ्यायचे ठरवले. मात्र या सुनावणीला त्याचे वकिल रविंद्र कुमार पालिवाल हे वकिली कोट न घालता चक्क बनियन घालून सर्वांसमोर आले. त्यांना असे आलेले पाहून न्यायमूर्ती भडकले व त्यांनी पालिवाल यांना ताकिद देत सुनावणी 5 मे पर्यंत पुढे ढकलली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या