कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी राज्य सरकार कर्ज काढणार?




रिपोर्टर  : कोरोनामुळे महाराष्ट्रापुढे दुहेरी संकट आले आहे. एकीकडे राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी राज्य सरकारला कर्ज काढावे लागेल अशी वेळ येऊ शकते. कोरोनाचे संकट पाहता लॉकडाऊनची घोषणा केंद्र आणि राज्य सरकारने केली. यामुळे राज्यात कोणतेच उद्योगधंदे सुरू नसल्यामुळे राज्य सरकारला जीएसटी, मुद्रांक शुल्क मधून मिळणारा महसूल बंद झाला आहे.

वर्ष 2019 मध्ये मार्च महिन्यात राज्याच्या तिजोरीत 42 हजार कोटींचा महसूल जमा झाला होता. यावर्षी सरकारला फक्त 7 हजार कोटी मिळाले आहेत. ही घट 60% इतकी आहे. एप्रिल महिन्यात आतापर्यंत राज्याला फक्त 4 ते 5 हजार कोटी महसूल उत्पन्न झाले आहे. त्यात केंद्राकडून जीएसटी परतावा महाराष्ट्राला मिळत नाहीये. सध्या राज्यावर 5.2 लाख कोटींचं कर्ज आहे, त्याच्या व्याजपोटी राज्याला 3 हजार कोटी द्यावे लागतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या