अन्न वाटपाच्या सेल्फी आणि फोटोवर बंदी, गुन्हा दाखल होणार
रिपोर्टर: कोरोनाला आळा घालण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन सुरु झाला. त्यानंतर अनेक गरजूंना मदत करण्यासाठी अनेक हात मदतीला सरसावले. मात्र, काहींनी मदत करतानाचे फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर टाकले. अशांवर आता गुन्हे दाखल होणार आहेत. अन्न पदार्थ आणि जेवण वाटणाऱ्यांनी जर त्याचा फोटो काढला तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय अजमेरच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी घेतला आहे.
अशा व्यक्तींवर कडक कारवाई करत त्यांच्यावर भा. दं. वि. कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करणार असल्याचे अजमेरचे जिल्हाधिकारी विश्व मोहन शर्मा यांनी सांगीतले आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या