सावंत प्रतिष्ठाणकडुन बहुरुपी कुटूंबीयांना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप
 नितीन जाधव..परंडा
सध्या सगळीकडे  कोरोना विषाणू  ने थैमान घातले आहे .विषाणू संसर्गामुळे  मुळे बाधीतांची संख्या दिवसागणीक वाढत असल्यामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. अशातच  मजुर ,कामगार ,लोककलावंत ,गावात फिरणारे रायरंद (बहुरुपी ) यांची रोजीरोटी बंद झाल्यामुळे त्यांचेवर आभाळ कोसळले आहे .दरम्यान अशीच एक भयावह  परिस्थिती रामकुंड ता.भूम फाट्यावरील पेशाने रायरंद (बहुरुपी)असलेल्या कुटूंबीयावर उपासमारी ओढवली होती.जिल्हा बंदी ,सीमाबंदी असल्यामुळे ते स्थलांतर करु शकत नाहीत तसेच  झोपडीच्या बाहेर पडू शकत नाहीत .येथिल 23 कुटूंबांना जगणेच मुश्कील झाले जवळचे सर्व आन्नधान्य संपल्यामुळे उपासमार सुरु होती. विकासरत्न प्रा .डॉ .तानाजीराव सावंत प्रतीष्ठान व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने रामकुंड ता .भूम फाटयावरील बहुरुपी ( रायरंद ) यांच्या 23 कुटुंबांना किराणा व अन्नधान्याचे मोफत वाटप  करण्यात आले .याची हकीगत अशी की स्वतःचे व कुटुंबाचे पोट भरण्यासाठी दारोदार फिरणारे रायरंद अन्नावाचुन भूकेले होते , त्यांच्या भूकेची दाहकता वाढत असतानाच त्यांच्यातीलच सुभाष शिंदे या व्यक्तिने शिवसेनेचे आमदार प्रा .डॉ .तानाजीराव सावंत यांना फोन केला व सत्यकथा सांगितली, आमदार सावंत यांनी लागलीच स्वतः त्या 23 कुंटुंबांना 15 दिवस पुरेल एवढा किराणा व 2 क्विंटल ज्वारी त्यांच्या पालावर जि .प .परीषद उपाध्यक्ष धनंजय सावंत व  प्रा.डॉ तानाजीराव सावंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून पोहोच केली . तेव्हा कृतज्ञता व्यक्त करताना बहुरुपी कुटूंबीयांनी सांगितले  आमच्या साठी खरा अन्नदाता देवदूत म्हणजे आमदार तानाजी सावंत ..
    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या