उस्मानाबाद मध्ये लॅकडाउन आणि संचार बंदीचे तिन तेरा.
रिपोर्टर: कोरोनासारख्या वायरसमुळे मानसाच्या जगण्या मरण्याचा प्रश्न सगळयांना सतावत आसताना उस्मानाबाद मध्ये जीवनावश्यक वस्तुचे किट घेण्यासाठी बिनधास्त पणे प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून 300 ते साडेतिनशे लोक शासकिय रूग्नालयात एका ठिकाणी जमतात याला जिम्मेदार कोण असा प्रश्न लॉकडाउनचे तंतोतंत पालन करणा—या उस्मानाबाद करांना पडला आहे.किट वाटपाच्या नावाखाली जांनी कोणी ही गर्दी जमवली यांच्या वर काय कारवाई होणार हा देखील महत्वाचा प्रश्न आहे.

उस्मानाबाद शहरामध्ये लॉकडाउनच्या पार्श्वभुमीवर शहरात जिकडे तिकडे तगडा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे.महत्वाचे काम असेल तरी पोलीस लोकांना माघारी घराकडे पाठवत आहेत.कोरोना वायरसचा मोठया वेगाने फैलाव होत आसताना उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात अन्नधान्य वाटप होत आहे हि बातमी वा-यासारखी पसरली आणि रुग्णालयात बेफाम अशी गर्दी झाली.. लोक एकमेकांच्या अंगावर पडु लागले.. सोमवारी सकाळी साडे आकरा वाजता किट वाटपाच्या नावाखाली तिनशे हुन अधिक लोकांचा जमाव एकत्रीत आला.नाम फउंडेेशनच्या माध्यमातुन आन्न धान्याच्या 50 किट वाटप करण्यात आल्या या 50 किट घेण्यासाठी जवळ जवळ 350 लोकांनी शासकीय रूग्णालयात गर्दी केली.सोमवारी वाटप झाल्या नंतर आज सकाळी ही त्याच ठिकाणी 50 ते 100 लोकांनी गर्दी केली.ही परिस्थिती पाहील्यावर संचार बंदी ठरावी लोकांसाठीच आहे का? असा प्रश्न पडने साहजिक आहे. नाम फाउंडेशन च्या माध्यमातुन हे वाटप कोण? केले वाटप करणाराने शासकिय नियमाचे पालन का केले नाही हे पहाणे सुध्दा सध्याच्या परिस्थितीमध्ये महत्वाचे आहे.
0 टिप्पण्या