‘कठीण परिस्थितीत Reliance Jio देतेय 498 रुपयांचा फ्री रिचार्ज’, वाचा व्हायरल मेसेजमागील सत्य

 रिपोर्टर         Reliance Jio कंपनीने नुकतेच आपल्या काही जुन्या डाटा पॅकमध्ये बदल केले असून दुप्पट डाटा दिला जात आहे. या सह कंपनीने जिओ फायबर सोबतही काही फ्री डाटा देण्याची घोषणा केली आहे. मात्र सध्या WhatsApp वर एक मेसेज फिरत असून यात जिओ कंपनी 31 मार्च पर्यंत 498 रुपयांचा रिचार्ज फ्री देणार असल्याचे म्हंटले आहे. मात्र याची पडताळणी केली असता हा मेसेज खोटा आणि खतरनाक असल्याचे दिसून आले.

जिओच्या नावाखाली फॉरवर्ड होणाऱ्या या मेसेजसोबत एक लिंक देण्यात आली आहे. यावर क्लिक करून तुम्हाला तुमची माहिती त्यामध्ये भरायची आहे. परंतु यामूळे तुमच्या फोनमधील महत्वाची माहिती, फोन नंबर आणि बँक डाटा चोरी होण्याची शक्यता आहे.

जगभरात कोरोना व्हायरस हाहाकार उडवत असून हिंदुस्थान मधील आकडा 600 च्या जवळ पोहोचला आहे. याचाच हॅकर्स फायदा उठवत आहेत. हॅकर्सकडून जिओच्या नावाने मेसेज पाठवला जात असून तो सध्या व्हायरल झाला आहे. अनेकांच्या मेसेज बॉक्समध्ये आणि व्हाट्सएपवर हा मेसेज आला आहे. परंतु हा एक फसवणुकीचा प्रकार आहे. यामुळे तुमचे बँक खातेही मोकळे होऊ शकते.काय आहे मेसेज?
व्हायरल मेसेजमध्ये नमूद करण्यात आले आहे की, ‘Jio’ या कठीण परिस्थितीत हिंदुस्थानी युझर्सला 498 रुपयांचा रिचार्ज फ्री देत आहे. 31 मार्चपर्यंत तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि जिओच्या फ्री रिचार्जचा लाभ घ्या.’ सोबतच एक लिंक देण्यात आलेली आहे. ही लिंक ओपन केल्यावर युझर्स जिओसारख्या वेबसाईटवर जातो आणि तिथे त्याला खासगी माहिती भरण्याचे सांगतो.

मात्र हा एक फ्रॉड असून यामुळे युझर मोबाईल अथवा डेस्कटॉपवर हॅकर्स नियंत्रण मिळवू शकतात आणि याच आर्थिक व मानसिक फटका तुम्हाला बसू शकतो. कारण जिओने याबाबत स्पष्टीकरण दिले असून आम्ही असा कोणताही प्लॅन आणला नसल्याचे आणि हा मेसेज खोटा असल्याचे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या