कोरोनाच्या शक्यतेने केंद्रीय कार्यालयात बायोमेट्रिक पद्धत बंद; देशात ३४ रुग्ण
वृत्तसंस्था : कोरोनाच्या विषाणूंचा संसर्ग झालेल्या भारतीयांची संख्या शनिवारी ३४ वर पोहोचली असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या साथीच्या प्रतिबंधासाठी योजण्यात येणाºया उपायांचा आढावा घेतला. जगभरात कोरोनाच्या बळींची संख्या ३,५00 वर गेली असून, एक लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. चीनमधील मृतांची संख्या मात्र कमी होत चालली आहे.

कर्मचाऱ्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी देऊ नये, असे पत्रक केंद्र सरकारने काढले आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटकमध्येही सरकारी कर्मचाºयांना बायोमेट्रिक हजेरी द्यावी लागणार नाही. काश्मीर खोºयात चार जिल्ह्यांतील प्राथमिक शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. कोरोनाचा रुग्ण कार्यालयात आढळल्याने फेसबुकने आपले लंडन, सॅन फ्रान्सिस्को व सिंगापूर येथील कार्यालये बंद केली आहेत. कोरोनाची लागण झालेल्यांना वेगळे ठेवण्यासाठी पुरेशी क्वारंटाइन केंद्रे उभारण्याची तयारी ठेवा व साथीचा प्रसार वाढतो आहे असे दिसल्यास उपचार व औषधांचा तुटवडा भासू देऊ नका, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले.
तीन नवे रुग्ण आढळल्याने भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३४ झाली. नव्या रुग्णांमधील एक दिल्लीचा रहिवासी आहे. इतर दोघांपैकी एक लडाखमधील असून, तो इराणला जाऊन आला होता. तिसरा तामिळनाडूतील असून, तो काही दिवसांपूर्वी ओमानला गेला होता. पंजाब व श्रीनगरमध्ये प्रत्येकी दोन संशयित रुग्ण आढळले असून, त्यांची तपासणी सुरू आहे. इराणमधील ३०० भारतीयांचे नमुने विमानाने येथे पोहोचले असून, ते चाचणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या