रिपोर्टर: संपुर्ण देशात कोरोना ने माजवलेला हाहाकार थांबवण्यासाठी राज्य सरकारने काही कठोर पाउले उचलली आहेत.सरकारच्या या आदेशाला मान्य करूण मुरूम शहरातील सर्व जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे असे आवहान मुरूम नगरपालिकेच्या च्या वतीने उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे यांनी केले आहे.
देशावर आलेले कोरोनाचे महाभयंकर संकट पहाता सर्वांचीच डोकेदुखी वाढली आहे.या महामारी वायरसवर मात करण्यासाठी प्रतेक नागरीकांनी आपल्या बरोबर दुस—यांच्या ही जिवाची काळजी घेणे गरजेचे आहे.प्रशासनाच्या आदेशा नुसार समुहात जाने टाळावे,गरज असेल तरच घराबाहेर पडावे,दर आर्ध्या तासाला आपले हात स्वच्छ दुहावेत त्याच बरोबर कामानिमीत्त बाहेर गेल्यावर तोंडाला स्वच्छ रूमाल बांधावा,बाहेरचे पदार्थ खाने टाळावे,घरातील लहान मुलांची आणि वयवृध्द मानसांची काळजी घ्यावी लग्न,समारंभ असे कार्यक्रम टाळावेत आणि सर्दी खोकला झाला असेल तर लगेच डॉक्टरांना भेटावे आशा प्रकारे काळजी घेतल्यास आपन कोराना सारख्या वायरसला हारवू शकतो.त्यामुळे प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य करावे असे आवहान मुरूम नगरपालिकेच्या च्या वतीने उपनगाराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे यांनी मुरूम शहरातील नागरीकांना केले आहे.
0 टिप्पण्या