
रिपोर्टर: अनिल धावारे
वाडी असो की वस्ती गावातील चौक असो की सार्वजनिक ठिकाण असो त्या ठिकाणी फक्त हेच ऐकायला मिळते ते म्हणजे कोरोन वायरसची चर्चा जगभरात कोरोना च्या धास्तीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याच पार्श्वभूमीवर कोरोन सारख्या व्हायरस वर मात करण्यासाठी.इतर ठिकाणा प्रमाणे बावी ग्रामपंचायतने सुध्दा आठवडी बाजार बंद ठेवून या वायरसवर मात करण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन केले.

ग्रामपंचायतीच्या वतीने गावांमध्ये दवंडी देऊन सर्व गावकऱ्यांना कोरोन सारख्या संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण कशा पध्दतीने करायचे आणि त्याची काळजी कशी घ्यायची यासाठी.बावी गावचे. सरपंच . शितल सुनील शिंदे. च्या वतीने ग्रामपंचायत मध्ये ठीक अकरा वाजता मीटिंग घेण्यात आली यावेळी. बावी गावच्या उपकेंद्रा च्या डॉक्टर विधाते यांनी कोरोन सारख्या संसर्गजन्य रोगांपासून बचाव कशा पद्धतीने करायचा आहे याची ग्रामस्थांना सविस्तर माहीती दिली. सर्दी खोकला ताप यासारखी लक्षणे आढळून आल्यास सरकारी दवाखान्यात भेट द्या आपले हात स्वच्छ धुवा बाहेर जाणे टाळा . मास्क किंवा रुमालाने आपले तोंड झाका गर्दीचे ठिकाणे टाळा कुटुंबाची काळजी घ्यावी असे इत्यादी माहीती त्यांनी दिली. यावेळी उपस्थित. सोमा साहेब शिंदे अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी कालिदास आप्पा शिंदे,किरण शिंदे,महादेव शिंदे,रोजगार सेवक अतुल शिंदे,जि प प्रा शाळा बावी. शिक्षक स्टाफ यांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या