कोरोनामुळे उदरनिर्वाह आडचनीत आलेल्या वैदूंना तामलवाडी पोलीसांच्या वतीने जीवनावश्यक साहित्याचे वाटप:






सावरगाव/रिपोर्टर 
सावरगाव येथे गेल्या दहा वर्षापूर्वी पासून वास्तव्यास असलेल्या वैदू (मर्गम्मा) समाजावर कोरोना संकटामुळे दररोजच्या खाण्यापिण्याचा प्रश्न ओढावला आहे.त्यांना मदत म्हणून तामलवाडी पोलीसांच्या वतीने जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक नितीन मिरकर, जिल्हापरिषद सदस्य राजकुमार पाटील , माजी सभापती संतोष बोबडे,सरपंच रामेश्वर तोड़करी,पोलिस पाटील समाधान डोके,पत्रकार भैय्या कुलकर्णी यांची उपस्थिती होती ....


 देशात कोरोनाचे राक्षशी संकट फोफावल्यामुळे केंद्र व राज्य सरकारला नाईलाज म्हणून लॉकडाउन सारखा निर्णय घ्यावा लागला.या निर्णयामुळे देशासह महाराष्ट्रात आन्न,धान्य मागुन जिवन जगनारांचे परपंच रस्त्यावर आले.त्यांना रोजच्या दोन वेळच्या जेवनाचा प्रश्न भेडसावू लागला.आशा काळामध्ये दानशुर लोक पुढे येवून होईल ती मदत या आडचनीत आसलेल्या लोकांना करू लागले.त्याचाच प्रत्यय तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे आला.कोणतीही आपत्कालीन स्थिती असो,ऊन,वारा,पाऊस, याची तमा न करता आपल्या कुटुंबाचा विचार न करता खाकी वर्दीतील पोलिस नेहमीच कर्तव्यावर हजर असतात, जगभरात यमदूत बनून आलेल्या कोरोना व्हायरस संसर्गजन्य रोगामुळे राज्यात संचारबंदी लागू झाली. आहे याच पार्श्वभुमीवर पोलीस नेहमीप्रमाणेच आपले कर्तव्य अतिशय अचूकपणे निभावत आहेत. लोकांच्या सुरक्षेबरोबरच तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मिरकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत माणुसकीचा धर्म निभावला आहे. सावरगाव येथे गेल्या दहा वर्षापासून वास्तव्यास असलेल्या वैदू (मर्गम्मा) समाजावर उपासमारीची वेळ आली होती,आता कसे पोट भरायचे हा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर चार दिवसांपूर्वी पासून उभा होता. गेल्या चार दिवसापासुन  पालावरील लहान मुले उपास झोपत आहेत. ही माहीती पोलीस निरीक्षक मिरकर यांना माहीत झाली असता.त्यांनी स्वखर्चाने  जीवनावश्यक किराणा साहित्य पालावरती जाऊन वाटप केले. उपासमारी ची वेळ आलेल्या वैदू मर्गम्मा समाजाच्या पालावर अन्नधान्य देणाऱ्या साहेब पोलीस निरीक्षक नितीन मिरकर यांचे व पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे, 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या