उस्मानाबाद जिल्हयातील १९ जणांची कोरोना चाचणी निगेटीव्ह



रिपोर्टर: -बाहेर देशातुन उस्मानाबाद जिल्ह्यात आलेल्या १९ जणांची कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आली आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा एक ही रुग्ण नाही.परंतु शासनाने दिलेले आदेश पाळणे म्हत्वाचे आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये परदेशात काही कामानिमीत्त गेलेले नागरिक काही दिवसापुर्वी आले होते.मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे त्यातील काहींनी स्वतः हून शासकीय रुग्णालयात येऊन तपासणी केली होती तर काही जणांना प्रशासनाने खबरदारी म्हणून तपासणी करायला लावली होती. त्यांचे घश्याचे स्त्राव चाचणीसाठी एन आय व्हि पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.२२ मार्च रोजी त्यांचा चाचणी अहवाल जिल्हा रूग्णालयाला प्राप्त झाला. सध्या त्या १९ जणांना होम क्वारंटाईनचा शिक्का मारून डिस्चार्ज देण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी सांगितले. वाशी -१, लोहारा-४, उमरगा - ९, तुळजापूर -२, उस्मानाबाद -२, मुरूम - १ अशी तपासणी केलेल्या नागरिकांची तालुका निहाय संख्या आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या