राज्यातील ३५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी नवीन २२ रुग्णांची नोंद;राज्यातील एकूण रुग्ण संख्या २०३ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती


रिपोर्टर: राज्यात कोरोनाचे २२ नविन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या २०३ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे असून ५ रुग्ण पुण्याचे, ३ नागपूरचे, २ अहमदनगरचे तर सांगली, बुलढाणा आणि जळगाव येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. दरम्यान, करोना आजारातून बरे झालेल्या एकूण ३५ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी दिली.
काल राज्यात २ करोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाले. एका ४० वर्षीय महिलेचा परवा के ई एम रुग्णालयात तीव्र श्वसनावरोधामुळे मृत्यू झाला होता.ती करोना बाधित असल्याचे काल स्पष्ट झाले. तिला उच्च रक्तदाबही होता. बुलढाणा येथे एका ४५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू करोना मुळे झाला तो मधुमेही होता. राज्यातील करोना बाधित एकूण मृत्यूची संख्या आता ८ झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या