माजी आमदार राहुल मोटे यांच्या मागणीला यश: राज्य सरकार दररोज खरेदी करणार 10 लाख लिटर दुधउस्मानाबाद रिपोर्टर   

भुम,परंडा,वाशी तालुक्यासह राज्यातील कोरोनामुळे आडचनीत आलेले दुध उत्पादक शेतकरी यांना माजी आमदार राहुल मोटे यांच्यामुळे दिलासा मीळाला आ​हे.मोटे यांच्या मागणीचा विचार करता राज्यसरकार आता दररोज 10 लाख लिटर दुध 25 रूपये प्रति लिटर दराने खरेदी करणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.त्यामुळे दुध व्यवसाईक शेतक—यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


भुम,परंडा,वाशी तालुक्यामध्ये शेतकरी जोड धंदा म्हणुन मोठया प्रमाणात दुधाचा व्यावसाय करतात.या तिन तालुक्यामध्ये दिवसाला 50 लाख लिटर दुध संकलीत होते.मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या संगळया दुधाचा प्रश्न निर्माण झाला होता.
वाढलेले अतिरिक्त उत्पादन आणि घटलेले भाव यामुळे भुम,परंडा,वाशी तालुक्यासह राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या होत्या.यासाठी भूम-परांडा-वाशीचे माजी आमदार राहुल मोटे यांनी राज्याचे दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, दुग्धविकास विभागाचे सचिव आणि जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून शासनामार्फत दूध खरेदी संदर्भात मागणी केली होती. त्या मागणीची पूर्तता झाली असून. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी त्याबाबत घोषणा केली आहे. राज्यसरकार आता 25 रु दराने दररोज 10 लाख लिटर दुध खरेदी करणार आहे.त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या