पाणीटंचाई कामात संबंधित अधिकारी,कर्मचाऱ्यांनी कामचुकारपणा करू नये - आ. डॉ तुषार राठोड



 

  
            
 भाजप - कॉंग्रेस - शिवसेना जि.प.सदस्यांनी बैठकीस फिरवली पाठ

     काँग्रेसच्या पं.स.सदस्यासह, महिला सदस्यांची अनुपस्थिती



          रिपोर्टर: /मुखेड महेताब शेख

          तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने तालुक्यात पाणी टंचाई भासणार नाही मात्र वाडी तांड्यावर नेहमीच पाणीटंचाई असून अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी पाणीटंचाई कडे गांभीर्याने लक्ष देऊन पाणी टंचाई भासू देऊ नये अन्यथा कामचुकार करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना आ. डॉ. तुषार राठोड यांनी मुखेड पंचायत समितीच्या वतीने दि ०७ रोजी तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा व निवारनार्थ बैठकीत सूचना दिल्या. 
          दरम्यान या बैठकीस बहुतांश सरपंच उपसरपंच यांची उपस्थिती होती मात्र तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य व काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. तुषार राठोड यांची उपस्थिती होती बैठकीस पंचायत समिती सभापती सौ. सविता पाटील खैरकेकर, नगराध्यक्ष बाबुसावकार देबडवार,
उपसभापती सौ.हऱ्याबाई गोंड, तहसीलदार काशीनाथ पाटील, गटविकास अधिकारी कैलास बळवंत, पा.पु.ल.पा.चे  उपाभियंता चव्हाण, वैैैध्यकिय अधिकारी डाॅ रमेश गवाले, लागवड अधिकारी निलेश सोनवने,प.स.सदस्य प्र. बालाजी पाटील सकनुरकर, प्रा.माधव मंदेवाड, राम गायकवाड, वसंत पाटील येवतीकर, लक्ष्मण पाटील खैरकेकर, शिवसेनेचे प.स.सदस्य नागनाथ कोटीवाले, नगरसेवक अशोक गजलवाड, नासेरखाँ पठाण,जगदिश बियाणी, विस्तार अधिकारी शंकर येवते, एस.बी. देवकत्ते, पि.एन.गर्जे, याची उपस्थिती होती. 
         यावेळी आमदार डॉ. तुषार राठोड यांचा सत्कार तहसीलदार पाटील,  गटविकास अधिकारी बळवंत, संतोष मठपती यांनी केला बैठकीचे प्रस्ताविक गटविकास अधिकारी कैलास बळवंत यांनी करून संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा बाबत  माहिती दिली. यावेळी आ.डॉ राठोड यांनी सूचना केल्या की गेल्या वर्षी तीव्र पाणीटंचाईच्या झळा होत्या २०७ अधिग्रहण द्वारे व ६० टँकरद्वारे तालुक्याला पाणीपुरवठा करण्यात आला मात्र यावर्षी चांगला पाऊस झाल्याने तलाव, नदी- नाल्यात पुरेसे पाणी आहे.  मागील काळात ६५ गावांना करोडो रुपयांच्या पाणीपुरवठ्याचे योजना कार्यान्वयीत झाल्या मात्र या कामात गैरव्यवहार झाल्याने योजना कुचकामी ठरल्या. तर यंदा ग्रामसेवकांनी अधिग्रहणाचे प्रस्ताव वेळीच प्रशासनाकडे सादर करावीत अन्यथा दिरंगाई करणार्‍यावर कडक कारवाई करण्याची सूचना करुन पाणीटंचाई बाबत अधिकारी व कर्मचारी गांभीर्याने घेऊन पाणीटंचाईवर मात करावी असे ते म्हणाले  यावेळी पंचायत समिती सदस्य बालाजी पाटील सकनुरकर,राम गायकवाड यांनी आपल्या भागातील समस्या मांडल्या यावेळी तहसीलदार काशिनाथ पाटील नगराध्यक्ष बाबू सावकार, पंचायत समिती सभापती, सौ सविता पाटील खैरेकेकर यांनी ही सूचना मांडल्या, दरम्यान या बैठकीकडे सर्वच जिल्हा परिषद सदस्यांनी व काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्यांनी बैठकीकडे पाठ फिरविली तर व्यासपीठावर बहुतांशी महिलांचे पतीच हजर होते  बैठकिस पंचायत समितीचे कक्षाधिकारी एम.एन.गुुुट्टे, आरोग्य विस्तार अधिकारी सचिन पांंढरमिसे, स्वप्नील कासार, सतोष  मठपती , गजानन पेंडकर, कृषी विभागाचे वडजे आदिनी परिश्रम घेतले याबैठकीस  ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, संरपंच, उपसंरपच, ग्रा.प.सदस्य उपस्थित होते. 

राम पाटील गायकवाड पंचायत समीती सदस्य 

पाणीटंचाई निवारण संदर्भात प्रतेकवर्षी कृती आराखडे तयार करण्यासाठी बैठका होतात पण फक्त बैठका व कागदावर कृती आराखडे तयार न होता प्रत्यक्षात त्या कामाची गावामध्ये  अंमलबजावणी होणे गरजेचे असुन निदान ५० टक्के तरी कामे झाली पाहिजेत तरच ग्रामीण भागातील गावांच्या पाण्याचे प्रश्न सुटतील....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या