जांब येथे दोन अल्पवयीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यु

 ,

 महामार्ग रस्त्याच्या पुलाचे काम करण्यासाठी खोदले होते खड्डे


  मुखेड / महेताब शेख

       मुखेड तालुक्यातील जांब बु पासुन जवळच  ५०० मी. अंतरावर असलेल्या १० फुटाच्या खोल खडयात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना दि. २२ फेब्राुवारी  रोजी साडेबाराच्या दरम्यान दुर्दैवी  घटना घडली.
      शिरुर अनंतपाळ येथील माधव अंतेश्वर सगर  व नायगांव जि.नांदेड  तालुक्यातील ज्ञानेश्वर अशोक हुलगुलवाड  या अकरा ते बारा वयोगटातील अल्पवयीन शाळकरी मुले वडील नसल्याने आजोबाकडे आजुळी जांब बु. येथील जि.प. शाळेत शिक्षण घेत होते.  जांब बु. लगत राज्य महार्गावरील पुलाचे बांधकाम करण्यासाठी मोठा खड्डा गेल्या अनेक दिवसापासुुन करण्यात आला होता त्या खडयात पाणी तुडुंब भरुन होते. त्यारस्त्यालगत जात असताना माधव अंतेश्वर सगर वय १२  वर्ष व ज्ञानेश्वर अशोक हुलगुलवाड वय ११ वर्षे यांचा पाय घसरल्याने पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. घटना कळताच जांब बु येथील पोलिस चौकीचे बिट जमादार नागोराव पोले, पो.कॉ. आत्माराम कामजळगे, पो.कॉ.मारोती मेकलवाड गावातील सामाजिक कार्यक्रते   बाळासाहेब पुंडे, संजय यरपुरवाड व इतर जनांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मयतांना बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जांब बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले.  याप्रकरणी मुखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु होती यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरवदे व पो.नि.
नरसिंग आकुसकर ,यांनी घटनास्थळी भेट दिली.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली जांब बु चौकीच्या पोलिस उपनिरीक्षक अनिता ईटुबोने हया करीत आहेत.
बु ते कंधार या राज्य महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने होत असल्याने यापुर्वी सुध्दा छोटे मोठे किरकोळ अपघात झालेले होते पण याकडे दुर्लक्ष केल्याने व सदरच्या खडयाजवळ काम करणाऱ्या कंपनीचा कर्मचारी नसल्याने सदर घटना घडली असल्याने या परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असुन या निराधार पाल्यांचा मृत्यू झाल्याने संबंधीत यंत्रणेकडून तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी जनतेतून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या