मुखेड उपजिल्हा रूग्णालयात एका वर्षात ८६२ मुले तर ८४१ मुलींनी घेतला जन्म... मुला पेक्षा मुलींचे प्रमाण कमीच...



जिल्ह्यात रूग्णालयाचे काम एक पाऊल पुढे   एका वर्षात १ हजार ६५१ नाॅर्मल डिलिव्हरी

मुखेड रिपोर्टर/महेताब शेख 

      मुखेड येथिल उपजिल्हा रुग्नालयाने  आता आपल्या कामकाजाचा चांगलाच
पल्ला गाठला आहे जिल्ह्यात रुग्नालयाचे काम एक पाऊल पुढे असुन एका वर्षात टार्गेटच्या तिन पटच्या जवळ काम केले अाहेत जानेवारी २०१९ ते ३१ जानेवारी २०२० या कालावधीत एका वर्षात १ हजार ६५१ नाॅर्मल डिलिव्हरी
तर ४६ सिझर व यातिल ६ मातांना जुळे बाळ जन्मले  असे  एकुण  १ हजार ७०३ बालके जन्मले असुन यात  ८६२ मुले, ८४१ मुलींनी जन्म घेतला अाहे मुला पेक्षा मुलींचे प्रमाण माञ कमीच आहे.यात जानेवारी ते जानेवारी ची नोंद अाहे
     जानेवारी २०१९  मध्ये नॉर्मल डिलिव्हरी ११२  तर सिजर  ३ डिलिव्हरी , फेब्रुवारीमध्ये नॉर्मल डिलिव्हरी १०० तर ८ सिजर डिलिव्हरी,  मार्च महिन्यात नॉर्मल  ११६ डिलिव्हरी तर सिझर १ डिलिव्हरी ,  एप्रिल महिन्यामध्ये ११८  नॉर्मल डिलिव्हरी तर २ सिझर  डिलिव्हरी , मे महिन्यात  १२५ नॉर्मल डिलिव्हरी तर ८ सिझर  डिलिव्हरी, जून महिन्यामध्ये १२२  नॉर्मल डिलिव्हरी तर २  सिझर डिलिव्हरी ,जुलै महिन्यात १२५  नॉर्मल डिलिव्हरी तर ५ सिझर डिलिव्हरी , ऑगस्ट महिन्यात १८२  नॉर्मल डिलिव्हरी तर
  ३ सिझर डिलिव्हरी , सप्टेंबर महिन्यामध्ये १८२  नॉर्मल डिलिव्हरी तर २ सिझर डिलिव्हरी , ऑक्टोबर महिन्यात १२५ नॉर्मल डिलिव्हरी तर २ सिझर डिलिव्हरी ,नोव्हेंबर महिन्यामध्ये १२१ नॉर्मल डिलिव्हरी तर २ सिझर डिलिव्हरी,  डिसेंबर मध्ये  १२० नॉर्मल डिलिव्हरी तर ३ सिझर डिलिव्हरी ,  तर ३१ जानेवारी २०२० रोजी १०३ नॉर्मल डिलिव्हरी तर ५ सिझर डिलिव्हरी
असे एकूण १ हजार ६५१ नॉर्मल डिलिव्हरी तर ४६  सिझर डिलिव्हरी करण्यात आली या  कामासाठी  उपजिल्हा रुग्णालयाचे  दरमहा  ५१  उद्दिष्ट असून वर्षाचे ६१२ उद्दिष्ट आहे तर उद्दिष्टाच्या दृष्टिकोनातुन पाहिल तर  हे उद्दिष्टांच्या तिप्पट काम एका वर्षात झाले त्याचबरोबर जानेवारी ते जानेवारी या कालावधीत १ हजार ६५१ नॉर्मल डिलिव्हरी ४६ सिझर डिलिव्हरी उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले आहे.६ जुळ्यासह १ हजार ७०३ बालकांचा जन्म झाला.यात ८६२ मुले तर ८४१ मुलींची संख्या आहे.

मुखेडचे १०० खाटांचे उप जिल्हा रुग्नालयात असुन अंतररुग्न व बाह्यरुग्न विभाग असुन 
वेगवेगळ्या आजारावर  शस्ञक्रिया केल्या जात असल्याने  शहर व  ग्रामीण भागातिल रुग्नांना  लाखो रुपयांची रुग्नांची  बचत होत आहे.रुग्नालयात डोळ्याची शस्ञक्रिया , कुटुंब कल्याण  शस्ञक्रिया, सिझर, अपंडेक्स, हार्णिया, हायड्रोसिल अशा इतरही शस्ञक्रिया होत असल्याने आता याचा चांगलाच फायदा रुग्नांना होत आहे. या उपजिल्हा रुग्नालयात दर दिवस बाह्यरुग्न  रुग्न संख्या पाहिली तर ७०० ते १००० च्या आसपास होत असते. तर अॅडमिट संख्या हि दिवसाला  ६० ते ७० आहे. तर अपघात विभाग व प्रस्तुती विभाग २४ तास रुग्न सेवेसाठी उपलब्ध करण्यात आल्यामुळे याचा अधिकच रुग्नांना फायदा होत अाहे. तर गरोदर महिला  रुग्नांच्या सेवेसाठी  मोफत सोनोग्राफीची व्यवस्था करण्यात आली आहे.एक्सरे,थुंकी, लघवी, ब्लड चेक केले जाते या मुळे उपचारासाठी व शस्ञक्रियेसाठी  मुखेड तालुक्यासह शेजारच्या तालुक्यातुन मोठ्या संख्येने रुग्न येतात.


यशस्वीतेसाठी यांनी काम पाहिले.
************************

उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. के .टाकसाळे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले , अस्तिरोग तज्ञ डॉ. आनंत  पाटील, नेञरोग तज्ञ डॉ. सुधाकर तहाडे,  सर्जन  डॉ. गोपाळ शिंदे, स्ञिरोग तज्ञ डॉ. प्रशांत खंडागळे , स्ञिरोग तज्ञ  डॉ. शोभा देवकते , वैद्यकिय अधिकारी बालाजी बिडवे,  डाॅ प्रसाद नुनेवार , भूलतज्ञ डाॅ. अर्चना पवार ,वैद्यकीय अधिकारी  डॉ. शिल्पा कळसकर, डाॅ. रमाकांत गायकवाड, डॉ. संदीप काकांडीकर, व डिलेव्हरी विभागातील
 कविता गिरी, प्रतिभा हळदेकर, वैशाली कुमठेकर ,सीमा मुंडकर ,शोभा कासेवाड, विद्या मुंडकर यासह रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या