८५ हजारांची लाच स्विकारतांना हंगरगा गावचे उपसरपंच रंगेहात:भष्टाचार प्रकरणातील तक्रार मागे घेण्यासाठी ग्रामसेवकासोबत 3 लाखांची झाली होती बोलणी

मुखेड / रिपोर्टर 

          भ्रष्टाचार प्रकरणातील  ग्रामसेवकांविरुद्धची तक्रार माघार घेण्यासाठी ३ लाखाची लाच टप्पे पाडून घेण्याचे ठरल्याने त्यातील ८५ हजारांचा पहिला टप्पा   स्वीकारत असताना एका उपसरपंचाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मुखेड तालुक्यात जेरबंद केले आहे.
        मुखेड तालुक्यातील हंगरगा प.क. ग्रामपंचायतीचे उप सरपंच संघरक्षित दिगांबर गायकवाड वय 35 वर्ष याने ग्रामसेवकाची तक्रार विभागीय आयुक्ताकडे केली होती.ग्रामपंचायत हंगरगा प.क. अंतर्गत केलेली विकासकामे निकृष्ट दर्जाची असल्याबाबत त्या तक्रारीत उल्लेख होता.ती तक्रार माघार घेण्यासाठी एकूण ३ लाख रुपये लाच टप्याटप्याने देण्याचे ठरले होते याविषयी ग्रामसेवकाने सदर तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिनांक २  फेब्रुवारी २०२० रोजी दिली. तक्रारीची पडताळणी विभागाने दि.५ फेब्रुवारी रोजी केली पडताळीनंतर तक्रारीची दखल घेत दि.६ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उप अधीक्षक डोंगरे यांच्या मार्गदर्शनात मुखेड शहरातील एका हॉटेलमध्ये सापळा रचण्यात आला. हंगरगा प.क. ग्रामपंचायतीचे उप सरपंच संघरक्षित दिगंबर गायकवाड यांनी लाचेचा पहिला ८५ हजार रुपयांचा हप्ता स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी हंगरगा ग्रामपंचायतीचे उप सरपंच संघरक्षित दिगंबर गायकवाड यांना रगेंहाथ पकडून जेरबंद केले. या कार्यवाहीत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे, पोलीस कर्मचारी हनमंत बोरकर, किशन चिंतोरे, अमरजीतसिंह चौधरी, अनिल कदम यांनी काम केले. हंगरगा ग्रामपंचायतीचे उप सरपंच गायकवाड यांच्या विरुद्ध मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे माहितीसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, कोणी लोकसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी हा शासकीय काम करण्यासाठी लाच मागत असेल तर त्या संदर्भाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला द्यावी. लाचेच्या मागणीचे फोनवरील बोलणे, एसएमएस, ओडीओ, व्हिडीओ असल्यास ती माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवावि तसेच कोणाकडे माहिती अधिकाराच्या कायद्यानुसार प्राप्त झालेली शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती  असेल तर ती माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला द्यावे असे आवाहाण करण्यात आले आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या