हाडोंग्री येथे पोलीस आणि ग्रामस्थानी केलेल्या नाला खोलीकरणाच्या कामाला पोलीस महानिरीक्षकांची भेट:



रिपोर्टर:   भुम तालुक्यातील हाडोंग्री येथे माजी जिल्हापरिषद अध्यक्ष बाळासाहेब हाडोंग्रीकर यांच्या पुढाकारातुन पोलीस अधिकारी आणि ग्रामस्थांनी श्रमदानातुन केलेल्या नाला खोलीकरणाच्या कामाला पोलीस महानिरिक्षक रविंद्र सिंघल यांनी भेट दिली.तसेच लोकर्पण आणि जलपुजनाचा कार्यक्रम महानिरीक्षक सिंघल यांच्या हास्ते घेण्यात आला.यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक राजतीलक रोशन, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर,अतिरिक्त पोलीस अधिक्षक संदिप पालवे,उपविभागीय पोलीस ​अधिकारी,विशाल खांबे,सहाययक पोलीस निरिक्षक जि,बी,पालवे,पोलीस निरीक्षयु,सी,शेख,आय,एस,सययद,मंगेश साळवे,यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती.

लोकार्पणाच्या कार्यक्रमावेळी बोलताना पोलीस महानिरीक्षक रविंद्र सिंघल म्हणाले की पोलीस आणि जनतेमधील दुवा कमी करण्यासाठी आशा कार्यक्रमाचे आयोजन नेहमी करायला पहीजे.पोलीस बांधवानी आणि ग्रामस्थांनी केलेले हे नाला खोलीकरणाचे काम पाहुण मला खुप आनंद झाला.आशा प्रकारची कामे वारंवार होणे गरजेचे आहे.मी ग्रामस्थांचे आणि ज्यांच्या पुढाकारातुन हे काम झाले ते बाळासाहेब पाटील यांचे ही मी आभार मानतो.पोलीस जेव्हा लोकांशी जोडले जातात तेव्हा ब—याच गोष्टी आम्हाला माहीत होतात.आणि त्याचा फायदा आमच्या दैनदिन कामामध्ये आम्हाला होतो.त्याच बरोबर युवा पिढीविषयी बोलताना पोलीस महानिरीक्षक म्हणाले की आजच्या युवकांनी मोबाइलचा योग्य वापर करावा आणि जास्त लक्ष आभ्यासाकडे दयावा म्हणजे भविष्यात तुम्हीसुध्दा मोठया पदावर जावुन देशाची सेवा कराल.

बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांच्या ध्यान साधना केंद्रालाही भेट.
 


बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांनी स्वखर्चाने शेतात बांधलेल्या ध्यान साधना केंद्रालाही पोलीस महानिरीक्षक यांनी भेट दीली.भुम तालुक्यातील होडोंग्री येथिल आपल्या शेतात पाटील यांनी ध्यान साधना केंद्राची उभारणी केली आहे.अकर्षक आणि नैसर्गीक पध्दतीने बांधण्यात आलेल्या या केंद्राचे पोलीस महानिरीक्षक सिंघल यांनी कौतुक केले.

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या