मुखेड / रिपोर्टर

या तिन दिवसीय द्वादश बारा ज्योतिर्लिंग दर्शन व राजयोग चित्र प्रदर्शनी त्याचबरोबर व्यसनमुक्ती चित्र प्रदर्शनाचे उदघाटन प्रसिद्ध -हदयरोगतज्ञ डॉ. अशोक कौरवार, भाजपाचे डॉ विरभद्र हिमगीरे यांच्या हस्ते करण्यात आले सदर शिबिरात महाशिवरात्रिचे महत्व, राजयोग व्यसनमुक्ती संदर्भात आधारित व परमपिता शिव परमात्म्याच्या ८४ व्य शिवजयंती निमित्त राजयोगा द्वारे मनुष्याच्या जीवनात खरी सुख शांति कशी प्राप्त होते या विविध विषयावर केंद्र चालक ब्रह्माकुमारी अरुणा बहेनजी यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले त्याचबरोबर सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक मडगुलवार, भागवत देबडवार, दिनकर पोलावार, गजानन, रेनगुंटवार सह बी.के.परिवाराचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले तसेच दिनांक २३,२४, २५ फेब्रुवारी २०२० रोजी या केंद्राद्वारे अोमशांती सेंटर भारत गॅस आॅफिस पाठिमागे मोंढा मार्केट मुखेड येथे तीन दिवसीय निशुल्क योग शिबिर होणार असुन या शिबिरामध्ये पुरूषांना सकाळी ८ :०० वाजता व महिलांसाठी सांयकाळी ५:०० वाजता मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी या शिबिरात शहर व तालुक्यातील जास्तित जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवून शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहाण प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय उपसेवाकेंद्र मुखेडच्या वतीने करण्यात आले आहे
0 टिप्पण्या