सचिन सोनारीकर यांचा प्राणीमीत्र पुरस्काराने सन्मान..




रिपोर्टर:परंडा तालुक्यातील तिर्थक्षेत्र सोनारी येथिल माकडाचे पालन पोषन करणा—या सचिन सोनारीकर यांचा उल्लेखनीय कार्या बददल उमरगा तालुक्यातील येणेगुर येथील फेस्टीवलमध्ये प्राणीमीत्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला.सदर पुरस्कार हा उस्मानाबादचे माजी खासदार रविद्र गायकवाड यांच्या हास्ते देण्यात आला.यावेळी उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौघुले अदी मान्यवरांची उपस्थिती होती.
 येणेगुर ता उमरगा येथे हा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यामध्ये चित्रपट क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, शेती क्षेत्रामध्ये व शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला ...
यामध्ये सोनारी येथील सचिन सोनारीकर यांचा प्राणीमित्र म्हणून पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या