विधानसभा क्षेत्राच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी लक्ष घालू - आमदार पाटील

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची आमदार संवाद मंच  प्रतिनिधी सोबत बैठक संपन्न


तुळजापूर - रिपोर्टर:
आमदार संवाद मंचने बसवंतवाडी येथे जलसंधारणासाठी केलेल्या कामाची  दखल घेऊन आगामी काळात विधानसभा क्षेत्रातील विविध प्रश्‍नासाठी आपण आमदार संवाद मंचच्या सोबत आहोत असे ठोस आश्वासन  तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीमध्ये दिले.

 तुळजापूर येथील आमदार संवाद मचंच्यावतीने विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना तालुक्यातील विविध विषयावर चर्चा करत निवेदन देण्यात आले यावेळी आपण प्रश्न मार्गी लावू तसेच विधानसभा क्षेत्रातील मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे आशावाद बोलून दाखवला,आगामी हिवाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विषयावर चर्चा करून प्रलंबीत विकासकामे करणार असल्याचे मत आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी व्यक्त केले.

तुळजापूर येथील शासकीय विश्राम ग्रह येथे आमदार संवाद मंच चे सर्व सदस्य आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याशी प्रथमच तुळजापूर विधानसभा क्षेत्रातील विविध विषयावर संवाद साधण्यात आला.यावेळी माजी नगराध्यक्ष बापूसाहेब कणे, पंडित जगदाळे, विजय कंदले,विनोद गंगणे,अविनाश गंगणे,बाळासाहेब शिंदे,आमदाऱ संवाद मचंचे अध्यक्ष डॉ. सतिष महामुनी, नगरसेवक अभिजित कदम,आनंद कंदले, कुमार टोले, जीवनराजे इंगळे, शुभम कदम, पत्रकार संजय गायकवाड अनिल धोत्रे, संजयकुमार बोंदर, संपर्क संस्थेचे प्रतिनिधी अनिल आगलावे  आदींची उपस्थिती होती.

तुळजाभवानी मंदिरासमोर भाविकांना त्रास देणाऱ्या बाल भिक्षेकऱ्या बाबत आमदार राणा पाटील यांनी पोलिस निरीक्षक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून माहिती घेतली, विधानसभा क्षेत्रात माध्यमिक शाळांमधील मुलींना सॅनिटरी नॅपकिन देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ अस्मिता कांबळे यांच्याशी  शिष्टमंडळ समोर चर्चा केली. जिल्हा परिषद शाळांना २४ तास लाईट मिळण्यासाठी सौर उर्जेचे प्रकल्प बसविण्याबाबत आपण यापूर्वीच काम सुरू केले आहे असे सांगून ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांची होणारी हेळसांड बाबत केंद्रनिहाय माहिती मला देण्यात यावी अशी सूचना त्यांनी आमदार संवाद मंचच्या प्रतिनिधींना केली.

विधानसभा क्षेत्रामध्ये बालविवाह विरोधी समिती व बालग्राम संरक्षण समिती, सर्व शासकीय कार्यालयामध्ये महिलासाठी स्वतंत्र  हिरकणी कक्ष स्थापन करण्याबाबत त्यांनी आश्वासन दिले. अनुदान घेणाऱ्या वाचनालयांना स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सक्तीने चालवण्याबाबत त्यांची स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. तालुका पातळीवर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अद्यावत करण्याबाबत जातीने लक्ष घालू, तालुक्यातील निवडक पाच गावांना व्यायामशाळा व तालीम बांधून देण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यानिमित्ताने दिलेले आहे. 

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याबरोबर आमदार संवाद मंच पदाधिकाऱ्यांची पहिलीच बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन प्रत्येक पंधरा दिवसानंतर यांचेकडून उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत चर्चा करण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. हाती घेतलेल्या प्रश्नाबाबत आमदार म्हणून मी पाठपुरावा करेन मात्र संवाद मंच कडून देखील पाठपुरावा केला गेला पाहिजे असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
Attachments area

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या