गावात आलाय बहुरूपी ,महाराष्ट्राची लोककला जपू : बहुरूपी समाजाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना साकडे : आमच्याकडे थोड बघा:

सावरगाव/रिपोर्टर  
दादासाहेब काडगावकर

 स्वातंत्र्यपूर्व काळापासून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बहुरूपी लोककला जोपासणारी माणसे वेगवेगळी सोंग घेऊन,गावोगावी फिरूण  मनोरंजन करायची,त्याला आपन भहूरूपी किंवा रायदंन म्हणायचो.   

‘बहू’ हा संस्कृत शब्द आहे, बहू म्हणजे अनेक  रूपं म्हणजे ठरावीक भूमिकेचे दृष्यस्वरूप,  प्राचीन काळापासून बहुरूपी जमातीचे अस्तित्व आहे, बहुरूपी भटके, अस्थिर असले तरी त्यांच्या  कलेची शकडो  वर्षांची परंपरा आहे,
बहुरूपी एक प्रामाणिक लोककलावंत कधीही कुणाची फसवणूक करत नव्हता आपल्या विनोदीशैलीतून मनोरंजन करायचा आणि मिळेल ते पसाकुटका धान्य  घेऊन जायचा , तो पुन्हा गावगाड्यात यायचा धान्यच्या राशीत अर्थात सुगीच्या दिवसात तेव्हा  कष्टकरी शेतकऱ्याच्या घरांमध्ये धान्याची थापी असायची आणि झोळी घेऊन  वाड्यासमोर उभा राहून फाटक्या झोळीत पसाकुटका धान्य  मागायचा , आता काळ बदलला आधुनिक युगात मनोरंजनाची माध्यम आली,  व्हाट्सअप,  फेसबुक, युट्युब, टीकटॉक, यासारख्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम घरबसल्या पाहायला मिळु लागल्याने , आता बहुरूपी लोककलावंताचे दिसणे दुर्मीळ झाले आहे ,  क्षणभरात वेगळ्या भूमिका मनोरंजन करणाऱ्या या कलावंताची छबी मराठी माणसांच्या मनात  कायमचीच कोरली आहे, पुर्वी  महाराष्ट्रातील लोककलापैकी बहुरूपी हा सर्वात महत्त्वाचा घटक समजला जायचा,आपल्या कलेतून समाज प्रबोधन करूण या मराठी मातीत मशागत करून त्यानेच कलाप्रेमी समाज घडविण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले आहे , बहुरूपी कलाकार आपली पारंपारिक कला टिकवत पूढे नेहत असल्याचे ग्रामीण भागात कुठेतरी दिसते.असेच तुळजापुर तालुक्यातील सावरगावात  बहुरूपी पहायला मिळाले.

 सकाळची वेळ सुगीचे दिवस धावपळीचे  वातावरण, मायमाउली घर कामात व्यस्त आहेत ,वाडयाच्या ओट्यावर दत्ता मास्तर बसलेले आहेत , अचानक सावकार अशी   भारदस्त आवाजाची हाक डोके यांच्या  वाड्यासमोर घुमते, तोच   कॉलेजात शिकणारा  अजितराव घराबाहेर  येतो , पोलिसाच्या वेशभूषेत  असलेली दोन तरुण बोलायला लागता कसकाय सावकार काय चाललाय,  काल सासरवाडी चा फोन  आलता तुमच्याकडे हुंडयातले पैसे आहेत अशी तूमच्या नावाची केस अली आहे, त्याच्याच वसुलीलला अलोयं, हुंडयाचे पैसे वसूल करण्यासाठी तुमच्या सासरयानीं  खास आम्हाला  विमानाने पाटवलें होते  पण विमान पम्चर  झाल्याने रेल्वेने आलोय,अशा विनोदीशैलीत मनोरंजनाच्या क्षणभरानंतर अजितराव घरातून छोटेखानी ताटलीमध्ये ज्वारी घेऊन मोठ्या मनाने  त्याच्याझोळीत टाकतो तोच बहुरूपी कलाकार पुढे मार्गस्थ होतात ...

बहुरूपी समाजाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना साकडे : आमच्याकडे थोड बघा: 

आज मनोरंजनाची साधने खूप झाल्याने बहुरूपी कला जोपासणे काट्यावरची कसरत बनली आहे,  शहरी भागापेक्षा ग्रामीण भागांमध्ये आमच्या कलेला  थोडाफार प्रतिसाद मिळतो,  लोकांचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या नकला कराव्या लागतात , यातून लोकांचे मनोरंजन होते , मिळालेल्या पसाभर धान्यातून, पैशातून घराची चूल पेटवत कुटुंबाच्या पोटाची खळगी भरतो,आम्हा  बहुरुपी कलावंतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी काहीतरी केलं तर त्यांचे फार उपकार होतील ,त्यांच्याकडून फार अपेक्षा आहेत मुख्यमंत्री साहेबांनी  आम्हाला प्रवाहात आणण्यासाठी एकादी नवीन योजना राबवावी  हीच अपेक्षा आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या