
एक वर्षापासून आरोपी होते फरार, एकाचा शोध लागेना.
आरोपीस पाच दिवसांचा पिसीआर...
मुखेड / रिपोर्टर
तब्बल १ वर्षापूर्वी मुखेड शहरात वीज वितरण कंपनीचा वीज भरणा जमा करणाऱ्या तिघांनी विज बिलापोटी जमा होणारी रक्कम वीज वितरण कंपनीकडे न जमा करता स्वतःकडेच ठेवून लाखो रुपयांचा अपहार केला होता. याबाबत एका सेवाभावी संस्थेच्या विरोधात मुखेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आरोपी विरोधात गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपी फरार झाले होते. त्यातील दोन आरोपींना पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले असून मात्र अजूनही एका आरोपीचा पत्ता लागला नसुन दोन्हीआरोपीना पोलिसांनीताब्यात घेतले असुन न्यायालयाने आरोपीना पाच दिवसाचे पिसीआर सुनावले आहे
शाहीर अण्णा भाऊ साठे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मर्यादित गडगा या संस्थेला मुखेड तालुक्यातील वीज भरणा बिल जमा करण्याचे कंत्राट मिळाले होते. यात शहरातील व तालुक्यातील लाखो रुपयांच्या वीज बिलाची रक्कम या वीज बिल भरणा केंद्रांमध्ये दररोज जमा होत होती. मात्र सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजय किशन भांगे, केंद्र संचालक राजू विजयराव राहेरकर यांच्यासह अन्य एकाने संगणमत करून विज बिल भरणा पोटी जमा झालेली रक्कम जमा केलेल्या ग्राहकाच्या नावे न जमा करता इतर ग्राहकाच्या नावे कमी बिल भरून बाकी ७ लक्ष ९ हजार ९३० रुपयांचा अपहार केल्याची बाब उघड झाली होती. कंपनीच्या नावे रक्कम न भरता स्वतःकडे ठेवून उशिराने रक्कम भरून कंपनीच्या केलेल्या कराराचा भंग केला. ही बाब समोर येऊ नये व आपण केलेला अपहार लक्षात न यावा या उद्देशाने आरोपींनी त्या विज भरणा केंद्रालाच आग लावली होती. मात्र या सर्व बांबीची वीज वितरण कंपनीकडून कसून चौकशी करण्यात आली. यात वरील लाखो रुपयांचा अपहार समोर आला. यात वीज वितरण कंपनीचे दोन कर्मचारीही दोषी आढळून आल्याने त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. या सर्व गैर कृत्याची फिर्याद महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कार्यालयाकडून मुखेड पोलीस स्टेशनमध्ये वरील तिन्ही आरोपींविरोधात १२ मार्च २०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपींनी पोबारा केला. गुन्हा दाखल होऊन जवळपास एक वर्ष होत आला तरीही या आरोपींचा पोलिसांना पत्ता लागत नव्हता, दरम्यान पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब मगरे, पो.ना. मोहन माडपत्ते, व चंदर आंबेवार यांनी गुप्त माहिती आधारे दि. २१ फेब्रुवारी रोजी आरोपी संजय किशन भांगे यास नायगाव तालुक्यातील गडगा येथून पोलिसांनी ताब्यात घेतले तर लगेच दुसऱ्या दिवशी २२ फेब्रुवारी रोजी सकाळच्यादरम्यान देगलूर तालुक्यातील तमलुर येथून राजु राहेरकर यास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. यातील एक आरोपी संस्थेचे सचिव अद्यापही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान या प्रकरणाचा कसून तपास केल्यास महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे बडे अधिकारी व कर्मचारी या प्रकरणात गुंतले असल्याचे निष्पन्न होणार असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे
अशा गंभिर विषयाकडे संबधित विभागाच्या वरिष्ठ अधिकां-यनी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांतुन व्यक्त होत आहे
0 टिप्पण्या