जाणीव अस्मितेची साहित्य परिषदच्या वतिने कविसंमेलन घेऊन केली रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी ——————————————


उस्मानाबाद... रिपोर्टर  
जाणीव अस्मितेची साहित्य परिषद मराठवाडा, जिल्हा शाखा उस्मानाबादच्या वतिने... मुकनायकच्या  शताब्दीवर्षानिमित्ताने व माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या७फेब्रुवारी जयंती निमित्ताने काल दि.७फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता  शिवाजी नगर,सांजा रोड,उस्मानाबाद येथे कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिध्द साहित्यिक,कवी मा.रंविंद्र शिंदे होते उदघाटक म्हणून अॅड.भारती रोकडे होत्या मंचावर प्रा.राजा जगताप(जाणीव अस्मितेची साहित्य परिषद मराठवाडा चे केंद्रीय उपाध्यक्ष ),अॅड.अजय वाघाळे,कवी विकास कांबळे(अध्यक्ष जाणीव अस्मितेची साहित्य परिषद उस्मानाबाद जिल्हा)उपस्धित होते.मान्यवरांनी माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे प्रारंभी पूजन केले.अध्यक्ष रविंद्र शिंदे यांचे स्वागत लेखक जयराज खुने यांनी केला यावेळी जिल्हा शाखा नवनियुक्त अध्यक्ष कवी वाकास कांबळे,कार्यकारी अध्यक्षा अॅड.भारती रोकडे,सचिव प्रा.सोहन कांबळे,सहसचिव सुदेश माळाळे,अमित रोकडे ,शिवाजी खुने या पदाधिकारी यांचा सत्कार रविंद्र शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.प्रास्ताविक करतांना प्रा.राजा जगताप म्हणाले की,नुकतीच आपण जाणीव अस्मितेची साहित्य परिषद स्थापन केली व माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती दिनी आज कविसंमेलनातून आपल्या शब्दधुंदीतून रमाईला कवितूतून अभिवादन करून घराघरात रमाई  निर्माण होण्यासाठी काम करणार आहोत.यावेळी १९कवींनी आपल्या रमाबाईच्या जीवनावरील कविता सादर केल्या .रमाईच्या कष्टावर या कविता सादर झाल्याने काव्यरसिकांनी दाद दिली व व रसिकांचे डोळे पानावलेले दिसले कवी पंडित कांबळे यांनी "रमाई"कविता सादर करून रसिकांना मंञमुग्ध केले...
"रमा तुझ्या कष्टातून ...
भिम झाला मोठा
संसारातील सुखाचा
साहूनिया वाटा"
कवी अभिमन्यू इंगळे यांनी "रमाई कोटीची माय झाली"ही कविता सादर केली
"माता रमाई साहेबांना म्हणाली...
या सा—यांना घास घास तरी कसा द्यायचा?
तवा साहेब रमाईला म्हणाले...
थांब रमा जरा मी,
सा—यांची सोय करतो."
कवी विकास कांबळे यांनी "बा भिमा" ही कविता सादर कूली
"बा भिमा..,
मी,श्वास घेतो आहे
अन्याया प्रतिकार करूनी
तुज विश्वास पेलतो आहे.
कवी रविंद्र शिंदे यांनी "रमाई"कविता सादर केली
"रमाई जरी गरिबीत जगली
तरी तिने शाहुचे लुगडे नसली
संविधानकर्ता तिचाच आहे
तिच्याविना जगणे व्यर्थ आहे."
यावेळी उदघाटक म्हणून बोलतांना अॅड.भारती रोकडे म्हणाल्या की,कविता काळजातून वास्तव मांडणारी लिहीली पाहिजे,भारतीय संविधानकर्ते डाॅ.बाबासाहेबांच्या पाठीमागे माता रमाई या सावलीसारख्या उभ्या राहिल्या त्याच पध्दतीने आजच्या स्ञीयांनी त्यागी जीवन जगले पाहिजे व माता रमाईच्या विचाराचे अनुकरण केले पाहिजे.
कविसंमेलनाचा अध्यक्षीय समारोप करताना अध्यक्ष रविंद्र शिंदे म्हणाले की, आज कवींची संख्या विपुल झाल्याणे कवितेचे बरेच पिक आले आहे परंतु चळवळीच्या कविंनी आपल्या कवितेतून परिवर्तनवादी ,प्रेरक विचार मांडले पाहिजेत आज समाजात अनेक विषय आहेत त्या विषयाला आपल्या कवितेतून वाट करून दिली पाहिजे व सामान्य माणसांचं वास्तव कवितेतून मांडलं पाहिजे.कविता ठरवून लिहिता येत नसली तरी त्या कवितेतून निर्भिडता आली पाहिजे.
यावेळी कवी प्रा.सोहन कांबळे,प्रा.राजा जगताप!अमित रोकडे,अॅड.भारती रोकडे यांनी रमाईवरील कविता सादर केल्या.
यावेळी अॅड.अजय वाघाळे,सुदेश माळाळे यांनी मुकनाय व माता रमाई यांच्या विषयावर आपली मनोगते व्यक्त केली.
सूञसंचालन कवी अभिमन्यू इंगळे यांनी केले .आभार पंडित कांबळे यांनी मानले
यावेळी जमलेल्या रसिकांनी कविसंमेलनाला चांगली दाद दिली.      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या