नगराध्यक्ष चषक व्हॉलीबॉल स्पर्धेत जेजुरी संघ विजेता तर येडशी संघ उपविजेता



रिपोर्टर:-उस्मानाबाद येथे वकील व्हॉलीबॉल संघातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा नगराध्यक्ष चषक मध्ये पुणे जिल्ह्यातील जेजुरी संघाने विजेतेपद पटकाविले ,31000 रु रोख व नगराध्यक्ष करंडक विजेत्या संघाला देण्यात आला तर उपविजेता येडशी जिल्हा उस्मानाबाद संघास 21000 रु रोख व करंडक देण्यात आला.
बक्षीस वितरण कार्यक्रमसाठी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनिल खोचरे,भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, उपनगराध्यक्ष अभय इंगळे,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अँड नितीन भोसले,गटनेते युवराज नळे,प्रगती पतसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील,
अँड कैलास बागल,माझी नगरसेवक अँड दर्शन कोळगे, युवराज राजेंनीबालकर,बालाजी कोरे आदी उपस्थित होते.
स्पर्धेतील तिसरे बक्षीस डोरलेवाडी जिल्हा पुणे,चौथे बक्षीस मुरुड जिल्हा लातूर ,पाचवे बालाजी नगर उस्मानाबाद, सहावे दूध डेअरी संघ सोलापूर, सातवे बार्शी , आठवे आदर्श उस्मानाबाद या संघांना देण्यात आले,रोख रक्कम व आकर्षक चषक असे या बक्षिसाची स्वरूप होते.स्पर्धेतील उत्कृष्ट शूटर म्हणून मुकेश शिंदे मुरुड तर उत्कृष्ट नेटमन म्हणून सोनू शिंदे आदर्श उस्मानाबाद यांना गौरविण्यात आले.
दि 21 व 22 रोजी झालेल्या या स्पर्धेत राज्यातून एकूण 45 संघांनी भाग घेतला होता.शनिवारी रात्री उशिरा अंतिम सामना झाला.या स्पर्धेस शेवटच्या दिवशी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे,अँड व्यंकटराव गुंड,
अँड राजेंद्र धारशिवकर यांनी भेट दिली.
नगराध्यक्ष मकरदराजे निंबाळकर यांनी संपूर्ण दोन दिवस मैदानावर उपस्थित राहुन खेळ बघण्याचा आनंद लुटला.
या स्पर्धेच्या आयोजन साठी अँड रत्नदीप पाटील,प्रताप मडके,नानासाहेब घोगरे,धैर्यशील सस्ते,बी आर पवार, प्रदीप टेळे, मालिकार्जुन आपचे,सुजित तिर्थकर,एन डी पाटील,विष्णू डोके,महेश ढेकणे,अमोल रणदिवे ,तसेच इतर विधिज्ञ व पदाधिकारी यांनी श्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या