रिपोर्टर:- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात टी पी ओ विभागामार्फत तृतीय वर्ष व अंतिम वर्ष विद्यार्थ्यासाठी तीनदिवसीय योग्यता पात्र
प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घघाटन पहला जॉब ट्रेनिंग सेंटरचे महेश यंगड व प्राचार्य डॉ. शेखर जगदे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांचा स्वागतपर सत्कार महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला. यावेळी प्रा डॉ एन डी पेरगाड, प्रा.आर.एच. आडेकर हे उपस्थित होते .
टीपीओ प्रमुख प्रा. छाया घाडगे यांनी तीन दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्देश विशद करून त्याबद्दल सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जगदे यांनी योग्यता पात्र प्रशिक्षण कार्यशाळा ही नोकरीसाठी कशी आवश्यक आहे. या कार्यशाळेमुळे होणारे फायदे, व्यक्तिमत्वाचा विकास व मुलाखत प्रणालीचे ज्ञान या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शरयू क्षिरसागर या विद्यार्थिनीने केले आभार प्रा. संतोष एकदंते यांनी मानले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्रा.एम.एस. धुरगुडे, प्रा. एम के नारायणकर,प्रा. प्रिया सुरवसे यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या